रेल्वेच्या धडकेमुळे मृत्यू
By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST
रेल्वेच्या धडकेमुळे मृत्यू
रेल्वेच्या धडकेमुळे मृत्यू
रेल्वेच्या धडकेमुळे मृत्यूनागपूर : रेल्वेची धडक लागून गंभीर जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मोहन महादेव गावंडे (४०) रा. झिंगाबाई टाकळी बंधूनगर यांना मानकापूर रेल्वे क्रॉसिंगजवळ रेल्वेची धडक लागली. यात ते गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी ९.१५ वाजता त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.