शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
5
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
6
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
7
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
8
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
9
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
10
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
11
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
12
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
13
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
14
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
15
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
16
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
17
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
18
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
19
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
20
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

सीआरपीएफच्या वाहनाखाली चिरडून निदर्शकाचा मृत्यू, संपूर्ण काश्मीर खोऱ्यात अशांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 1:13 AM

सीआरपीएफच्या वाहनाखाली शुक्रवारी चिरडल्या गेलेल्या तीन निदर्शकांपैकी एकाचा शनिवारी रुग्णालयात मृत्यू झाल्याने श्रीनगर व संपूर्ण काश्मीर खो-यातील वातावरण चिघळले असून, सुरक्षा दलांच्या सर्वच वाहनांवर जोरात दगडफेक सुरू आहे.

श्रीनगर : सीआरपीएफच्या वाहनाखाली शुक्रवारी चिरडल्या गेलेल्या तीन निदर्शकांपैकी एकाचा शनिवारी रुग्णालयात मृत्यू झाल्याने श्रीनगर व संपूर्ण काश्मीर खो-यातील वातावरण चिघळले असून, सुरक्षा दलांच्या सर्वच वाहनांवर जोरात दगडफेक सुरू आहे. ज्या वाहनाखाली निदर्शक चिरडून मरण पावला, त्याच्या चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बडगाम, श्रीनगर व ब-याच शहरांत अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.श्रीनगरमध्ये काल दुपारपासून वातावरण अशांतच होते. सुरक्षा दलाचे जवान व काही तरुण यांच्यात बाचाबाची झाल्यामुळे ते आणखी चिघळले आणि निदर्शकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक सुरू केली. तिथे बराच मोठा जमाव उभा होता. त्याच वेळी सीआरपीएफचे एक वाहन तिथे आले. निदर्शकांनी ते अडवण्याचा प्रयत्न केला व त्याच्यावर दगडफेकही केली. त्यामुळे वाहनचालकाने जमावातच वाहन घुसवून ते पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिघे तरुण त्याखाली चिरडले. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण या प्रकारामुळे तरुण अधिकच संतापले. आज सकाळी तिघांपैकी एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरताच पुन्हा स्थानिक लोक रस्त्यांवर उतरले. श्रीनगरच्या नौहट्टा भागात हा प्रकार घडला.पोलीस अधिकाºयाने सांगितले की, सीआरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकाºयाला ठराविक ठिकाणी सोडून हे वाहन परतत असताना, ते निदर्शकांच्या गर्दीत सापडले. हे वाहन गर्दीत सापडल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. निदर्शक वाहन अडवण्याचा प्रयत्न करीत आहेत आण चालक ते वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे, असे त्यात दिसते. गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्नात तीन जण त्याखाली चिरडले असावेत, असे सांगण्यात आले.निदर्शकाच्या मृत्यूनंतर सावधगिरीचे उपाय म्हणून पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे. तसेच मोबाइल इंटरनेट सेवा थांबवण्यात आली आहे. श्रीनगर व अन्य शहरांत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दहशती हल्ल्याच्या शक्यतेमुळे संपूर्ण काश्मीर खोºयात एरवीही ठिकठिकाणी तसेच लष्कराच्या कॅम्पवर जवान तैनात करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)ओमर अब्दुल्ला यांची टीकारमझानच्या काळात सुरक्षा दले स्वत:हून गोळीबार करणार नाहीत, असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे आता निदर्शकांना वाहनांखाली चिरडले जात आहे की काय, असा सवालवजा टीका माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर