शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

बिहारात राजकीय पक्षांचे ‘डीनर डिप्लोमसी’

By admin | Updated: February 19, 2015 01:43 IST

बिहारातील सत्तेसाठीचा राजकीय संघर्ष निर्णायकी अवस्थेत पोहोचला असतानाच ‘लंच अँड डीनर डिप्लोमसी’लाही वेग आला आहे़

पाटणा : बिहारातील सत्तेसाठीचा राजकीय संघर्ष निर्णायकी अवस्थेत पोहोचला असतानाच ‘लंच अँड डीनर डिप्लोमसी’लाही वेग आला आहे़ राज्याचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांना येत्या शुक्रवारी (२० फेबु्रवारी) बहुमत सिद्ध करायचे आहे, त्या पार्श्वभूमीवर आपले आमदार ‘कळपा’बाहेर जाऊ नयेत यासाठी, जनता दल (युनायटेड), भाजप आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) अशा सर्वच पक्षांत ‘डीनर डिप्लोमसी’च्या निमित्ताने रणनीती आखली जात आहे़मंगळवारी रात्री माजी मंत्री गौतम सिंह यांच्या निवासस्थानी जदयुचे आमदार विनोद सिंह यांनी रात्रीच्या मेजवानीचे आयोजन केले होते़ गौतम सिंह आणि विनोद सिंह हे दोघेही राज्याचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे निकटचे म्हणून ओळखले जातात़ जदयु आमदारांसह जदयुचे मित्रपक्ष असलेल्या राजद, काँग्रेस आणि भाकपा आदी पक्षांचे वरिष्ठ नेते, आमदार अशा सर्वांनी गौतम सिंह यांच्या घरच्या या मेजवानीला हजेरी लावत नितीशकुमारांना आपला पाठिंबा दर्शवला़बुधवारी दुसऱ्या दिवशीही या राजकीय जेवणावळी सुरू होत्या़ राजदच्या विधिमंडळ पक्षाचे नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांनी आपल्या निवासस्थानी दुपारी भोजनासाठी जदयु, काँग्रेस, भाकपच्या आमदार, खासदार व नेत्यांना निमंत्रित केले़ संध्याकाळी जदयु नेते आणि माजी मंत्री विजय कुमार चौधरी यांच्या निवासस्थानी ‘डीनर डिप्लोमसी’ झाली़ चौधरी यांची अलीकडेच जदयु विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे़ गुरुवारी माजी साखर उद्योगमंत्री रंजू गीता यांच्या घरी ‘लंच डिप्लोमसी’ होणार आहे़भाजप गोटातही आजपासून सुरू झालेल्या आपल्या विधिमंडळ पक्षनेत्यांच्या बैठकीच्या निमित्ताने ‘लंच अँड डीनर डिप्लोमसी’ रंगणार आहे़ राजदचे २४, काँग्रेसचे ५, भाकपचा १ आणि अपक्ष १ अशा १३० आमदारांच्या पाठिंब्याचा दावा नितीशकुमार यांनी केला आहे़ २४३ सदस्यीय बिहार विधानसभेत दहा जागा रिक्त आहेत व बहुमतासाठी ११७ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे़ च्बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यापूर्वी धोरणात्मक निर्णय घेण्यापासून रोखणाऱ्या पाटणा उच्च न्यायालयाने बुधवारी आपला पूर्वीचा आदेश पलटवत मांझी सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्याची मुभा दिली़ मात्र सोबतच या निर्णयाची अंमलबजावणी २१ फेबु्रवारीपर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश दिला़च्गत १६ फेबु्रवारीला उच्च न्यायालयाचे न्या़ इक्बाल अहमद अन्सारी व न्या़ समरेन्द्र प्रताप सिंह यांच्या खंडपीठाने सरकारला मोठा दणका देत, बहुमत सिद्ध करण्यापूर्वी कुठलाही धोरणात्मक निर्णय घेण्यापासून रोखले होते़ मात्र न्या़एल़ नरसिम्हा रेड्डी आणि न्या़ विकास जैन यांनी मात्र हा निर्णय बदलत, मांझी सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्याची परवानगी दिली़च्येत्या २० फेबु्रवारीपासून सुरू होणाऱ्या बिहार विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर भाजपने बहिष्कार टाकला़ बैठकीत सहभागी अन्य पक्षांनी सभागृहातील आसनव्यवस्थेबाबतचे सर्वाधिकार विधानसभाध्यक्ष उदय नारायण चौधरी यांच्या सुपूर्द केले़