शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

तेजस्वी यादव यांना राजीनामा देण्यासाठी नितीश कुमारांकडून डेडलाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 17:35 IST

अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राजीनामा द्यावा यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार प्रयत्न करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे

पाटणा, दि. 25 - अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राजीनामा द्यावा यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार प्रयत्न करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. शुक्रवारपासून राज्याच्या अधिवेशनाला  सुरुवात होत आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा खराब होऊ नये यासाठी नितीश कुमार लवकरात लवकर तेजस्वी यादव यांचा राजीनामा मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत. तेजस्वी यादव यांच्या उपस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ आहात का ? असा सवाल पत्रकाराने विचारला असता आपल्या सरकारला कोणताही धोका नसल्याचं त्यांनी सांगितलं. सीबीआयने हॉटेलच्या गैरव्यवहार प्रकरणात तेजस्वी, लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेल्वेच्या दोन हॉटेल्सच्या देखभालीचे कंत्राट देण्याच्या मोबदल्यात पाटणा येथील मोक्याचा भूखंड पदरात पाडून घेतल्याचा या तिघांवर आरोप आहे. 2006 मध्ये लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना हा व्यवहार झाला होता. दरम्यान लालू प्रसाद यादव यांनी पक्षाची बैठक बोलावून या पायरीवर तेजस्वी यादव यांनी राजीनामा दिला पाहिजे की नाही यावर चर्चा केली. नितीश कुमार यांनी पुढील 72 तासांत तेजस्वी यादव आपला राजीनामा सुपूर्द करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दोन्ही पक्षांमध्ये सुरु असलेला वाद कमी व्हावा यासाठी तेजस्वी यादव यांनी गेल्या आठवड्यात नितीश कुमार यांची भेट घेतली होती. मात्र यामधून कोणताही तोडगा मिळाला नाही. नितीश कुमार यांनी यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना फोन करुन मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. मात्र काँग्रेसला त्यामध्ये म्हणावं तसं यश मिळालं नाही. नितीश कुमार यांनी दिल्लीला जाऊन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. मंगळवारी पार पडलेल्या रामनाथ कोविंद यांच्या शपथविधीला नितीश कुमार आणि राहुल गांधी उपस्थित होते. यावेळी राहुल गांधींना विचारलं असता, 'हा आमच्यातील अंतर्गत मुद्दा आहे', असं सांगितलं.