शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

सरकारसाठी दाऊद लापता!

By admin | Updated: May 6, 2015 03:16 IST

दाऊद इब्राहिमला भारताच्या सुपुर्द करण्याची मागणी पाकिस्तानकडे आग्रहाने करणा-या केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत मात्र आपल्याला दाऊदचा नेमका ठावठिकाणा माहीत नसल्याचे कबूल केले.

केंद्राची संसदेत कबुली : काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोलनवी दिल्ली : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारताच्या सुपुर्द करण्याची मागणी पाकिस्तानकडे आग्रहाने करणा-या केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत मात्र आपल्याला दाऊदचा नेमका ठावठिकाणा माहीत नसल्याचे कबूल केले. मोदी सरकारच्या या स्पष्टीकरणामुळे नवा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे डी. पी. त्रिपाठी आणि काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी या मुद्द्यावर सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत सरकारच्या या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताच्या प्रतिष्ठेला धक्का लागला असल्याचा आरोप केला. कारण दाऊद पाकिस्तानात असल्याचा दावा भारताकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत असून, पाकिस्तानने मात्र नेहमीच याचा इन्कार केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते गौरव गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. सत्तेत आल्यानंतर दाऊदच्या मुसक्या बांधू, असे आश्वासन मोदी यांनी निवडणूक प्रचारात दिले होते, याचे स्मरण त्यांनी करून दिले. सरकारच्या या उत्तराने पाकिस्तानचा खोटा दावा खरा सिद्ध केला आहे, असाही त्यांचा आरोप होता. लोकसभेत नित्यानंद राय यांच्या प्रश्नाच्या लिखित उत्तरात गृहराज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी हे धक्कादायक उत्तर दिले. दाऊदच्या ठावठिकाण्याचा शोध अद्याप लागलेला नाही. तो कुठे आहे, हे कळल्यानंतर प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरूकेली जाईल, असे त्यांनी नमूद केले. मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेसह देशातील दहशतवादाच्या अनेक घटनांमध्ये आरोपी असलेला दाऊद आणि इतर दहशतवाद्यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे, असा प्रश्न राय यांनी विचारला होता. दाऊद इब्राहिम कासकर हा मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलचा मुलगा. १९८0 च्या दशकात पोलिसाच्या या मुलाचा अंडरवर्ल्डमध्ये प्रवेश झाला आणि आजतागायत त्याच्या नावाचा दबदबा कायम आहे. दरोड्यापासून सोन्याच्या तस्करीपर्यंतच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या दाऊदने मुंबईहून दुबईला पलायन केले. मुंबईतील बेनामी मालमत्ता, बॉलीवूडमधील दहशत, बिल्डरांशी साटेलोटे या वेगवेगळ््या कारणांनी तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)दबाव वाढवासरकारने दाऊदला परत आणण्याच्या आश्वासनाची पूर्तता करावी आणि यासाठी पाकिस्तानवर दबाव वाढवावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.दाऊदविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सुद्धा त्याच्याविरुद्ध नोटीस काढली आहे, परंतु अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. सरकारने दहशतवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये फरार आरोपींच्या प्रत्यार्पणाबाबत त्वरित कारवाई करण्याची विनंती संबंधित देशांना केली आहे. - केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरीभारताने दाऊदबद्दल माहितीचे अनेक दस्तऐवज यापूर्वीच पाकिस्तानला दिले आहेत. यात त्याच्या पाकिस्तानातील ठावठिकाण्यांचीही माहिती आहे. दाऊद भारतातून फरार असून, त्याला देशाकडे सुपुर्द करण्याचे आवाहन पाकिस्तानला वेळोवेळी करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी २७ डिसेंबर २०१४ रोजी लखनौत बोलताना दिली होती. याच दिवशी गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिल्लीत बोलताना दाऊदविरुद्ध सबळ पुरावे असून, त्याला भारताकडे सोपविण्याची मागणी पाकिस्तानकडे केली असल्याचा दावा केला होता. मुंबईत बॉम्बस्फोट घडवले > टायगर मेमनसारख्या हस्तकांच्या मदतीने आणि आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या इशाऱ्यावरून १९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट मालिका घडवली आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा अंदाज गुप्तचर यंत्रणांना आला. मात्र तोपर्यंत त्याने दुबई सोडून पाकिस्तानात धाव घेतली. > पाकिस्तानातूनही त्याने छोटा शकील आणि अबू सालेमसारख्या साथीदारांच्या माध्यमातून केवळ मुंबईतच नव्हे, तर भारतातील वेगवेगळ््या शहरांत आपल्या टोळीच्या कारवाया सुरू ठेवल्या.