शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

हृदयद्रावक! लेक टीव्ही सीरियल्समध्ये हिरोईन; आईवर 90 व्या वर्षी आली भीक मागण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 15:47 IST

एका महिलेची डोळे पाणवणारी गोष्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. वयाच्या 90 व्या वर्षी या महिलेवर भीक मागण्याची वेळ आली आहे

एका महिलेची डोळे पाणवणारी गोष्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. वयाच्या 90 व्या वर्षी या महिलेवर भीक मागण्याची वेळ आली आहे. या महिलेचा नवरा बाराबंकीमध्ये प्रसिद्ध फिजीशियन होता आणि मुलगी मुंबईत हिरोईन आहे, पण आज वयाच्या या टप्प्यावर ही वृद्ध महिला पोटापाण्यासाठी पाटण्यातील गंगेच्या काठी काली घाटावर रोज भीक मागते.

बाराबंकी येथील रहिवासी असलेल्या महिलेचे पती डॉ. एचपी दिवाकर यांची 1984 मध्ये संपत्तीच्या वादातून हत्या करण्यात आली होती. पतीच्या निधनानंतर घाबरलेल्या महिलेने सासरच्या घरची आपली संपत्ती सोडून पाटण्याला गेली आणि मावशीच्या घरी राहून मुलांचा सांभाळ केला. मुलगा एकेकाळी परिसरातील प्रसिद्ध गायक होता, मात्र डिप्रेशनमुळे तो खचला आहे. तर मुलगी टीव्ही सीरियलमधली प्रसिद्ध हिरोईल असून ती आईला विसरली आहे. वयाच्या 90 व्या वर्षी असहाय व निराधार वृद्ध महिलेला भीक मागावी लागते.

नवर्‍याच्या मृत्यूनंतर मुलांना शिकवलं

वयाच्या 90 व्या वर्षी नदीकिनारी भीक मागणाऱ्या या वृद्ध महिलेचं नाव आहे पूर्णिमा देवी, मुलगी हिरोईन तर मुलगा एकेकाळी परिसरातील प्रसिद्ध गायक होता. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथील महाकाल मंदिराचे पुजारी हरिप्रसाद शर्मा यांची कन्या पूर्णिमा देवी हिने मध्यंतरी शिक्षण पूर्ण केल्यानंतर बाराबंकी येथील प्रसिद्ध वैद्य डॉ. एचपी दिवाकर यांच्याशी विवाह केला. लग्नाच्या दहा वर्षात एक मुलगा आणि एक मुलगी झाली. डॉक्टर असण्यासोबतच त्यांचे पती दिवाकर यांना गाणी लिहिण्याची आवड होती.

गाणं शिकली, रेडिओवर गायला सुरुवात केली

1984 साली मालमत्तेच्या वादातून पती डॉ. एच.पी. दिवाकर यांची काही लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. पतीच्या निधनानंतर पौर्णिमाने सासरचे घर सोडले आणि पाटण्याला जाऊन मावशीच्या घरी राहू लागली. गाणं शिकली आणि रेडिओवर गायला सुरुवात केली. यानंतर पौर्णिमाने आपल्या कमाईतून मुलांचा सांभाळ केला आणि हळूहळू पाटणा येथील एका शाळेत संगीताचे वर्ग द्यायला सुरुवात केली, तसेच अनेक स्टेज शो केले.

मुलगी टीव्ही इंडस्ट्रीत करते काम 

झारखंडमधील गढवा येथून 1990 मध्ये सुरू झालेला गायनाचा प्रवास 2002 पर्यंत सुरू होता. मुलगाही ऑर्केस्ट्रामध्ये रफीची गाणी म्हणत असे, मात्र काही काळानंतर मुलगा डिप्रेशनचा बळी ठरला. पटनामध्ये शिक्षण घेतल्यानंतर मुलगी मुंबईला गेली आणि टीव्ही मालिकांमध्ये हिरोईन बनली. हिरोईन बनल्यानंतर ती कधीही आईकडे परतली नाही. तिला ओळखणारे लोक सांगतात की तिच्या मुलीने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. वयाच्या 90 व्या वर्षी असहाय्य आणि निराधार असलेल्या पौर्णिमा देवींना भीक मागावी लागत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.