शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नातीवर बलात्कार करून लंडनला पळणाऱ्या आजोबाला अटक

By admin | Updated: July 7, 2017 12:31 IST

आरोपी आणि त्याच्या पत्नीला लंडनला पळून जात असताना मुंबई एअरपोर्टवर अटक करण्यात आली.

ऑनलाइन लोकमत

गुरूग्राम, दि. 7- पाच वर्षाच्या नातीवर बलात्कार करणाऱ्या 64 वर्षीय नराधमाला गुरगाव पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी संध्याकाळी आरोपी आणि त्याच्या पत्नीला लंडनला पळून जात असताना मुंबई एअरपोर्टवर अटक करण्यात आली.आरोपीच्या पत्नीला पीडितेला मारहाण केल्याचा तसंच घडलेला प्रकार पीडितेच्या आईपासून लपविल्याचा आरोप ठेवून अटक करण्यात आली आहे. हिंदूस्तान टाइम्सने ही बातमी दिली आहे.
 
आरोपी मुंबई एअरपोर्टवरून लंडनला पळून जाणार असल्याची माहिती गुरगाव पोलिसांना मिळताच त्यांच्या तीन जणांच्या पथकाने त्या दोघांना अटक केली. या दोन्ही आरोपींना गुरूवारी गुरगावमध्ये नेऊन त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 
 
"मुंबई एअरपोर्टवर आरोपी विमानाची वाट पाहत असताना आमच्या पथकाने त्यांना अटक केली आहे. बलात्कार प्रकरणी आपल्याला अटक होणार याची त्यांना माहिती असल्याने त्या दोघांना शहर सोडून जायचं होतं. आधी महिला पोलीस स्टेशनची टीम त्यांच्या जमशेदपूरमधील घरी गेली असता घराला कुलूप असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यावेळी पोलीस पथकाने आम्हाला तात्काळ त्याची माहिती देऊन सावध केलं. महिला पोलीस टीमच्या माहितीनंतर आम्ही या जोडप्यासाठीची शोध मोहीम सुरू केली असल्याची माहिती ही संपूर्ण कारवाई करणारे पोलिस अधिकारी कैलाश यांनी दिली आहे. 
 
पतीसह संपूर्ण घरच्यांचा तीव्र विरोध असूनही मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सासू-सासऱ्यांच्या विरोधात तक्रार केल्याने पीडितीच्या आईला याचं श्रेय द्यायला हवं. त्यांच्या तक्रारीशिवाय ही घटना उघड झालीच नसती, असंही त्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
 
आणखी वाचा 
 

मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला चोप

तरुणीचे अपहरण आणि बलात्कार ?

अपहृत मुलगी सापडली आईकडेच

मुळचं झारखंडमधील जमशेदपूरचं असणार पीडित मुलीचं कुटुंबिय गुरगाव सेक्टर 59 मध्ये राहतात. पीडित मुलीचे आजोबा तसंच याप्रकरणातील आरोपी एका खाजगी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होते.

पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, चिमुरडी जमशेदपूरमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत आजी-आजोबांच्या  घरी गेली असताना ही घटना घडली होती. तसंच आरोपीच्या पत्नीने मुलीला मारहाण केली तसंच घरी सांगितलं तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली होती.