कॉम्रेड महादेव राऊत यांचे देहदान
By admin | Updated: January 23, 2015 01:03 IST
हायकोर्ट : तरुणींवरील प्राणघातक हल्ल्यांच्या प्रकरणात भूमिकाराकेश घानोडेनागपूर : एकतर्फी प्रेमातून तरुण मुलींविरुद्धचे गुन्हे वाढत असल्यामुळे रोड रोमिओंना धडा शिकविण्यासाठी अशा प्रकरणांत न्यायालयांनी कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे, या मताला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पाठिंबा दर्शविला आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणींची हत्या करणे, धारदार शस्त्राने गंभीर जखमी करणे, ...
कॉम्रेड महादेव राऊत यांचे देहदान
हायकोर्ट : तरुणींवरील प्राणघातक हल्ल्यांच्या प्रकरणात भूमिकाराकेश घानोडेनागपूर : एकतर्फी प्रेमातून तरुण मुलींविरुद्धचे गुन्हे वाढत असल्यामुळे रोड रोमिओंना धडा शिकविण्यासाठी अशा प्रकरणांत न्यायालयांनी कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे, या मताला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पाठिंबा दर्शविला आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणींची हत्या करणे, धारदार शस्त्राने गंभीर जखमी करणे, ॲसिड फेकून चेहरा विद्रुप करणे अशाप्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब लक्षात घेता गोंदिया सत्र न्यायालयाने अशा प्रकरणांत कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत नोंदवून आरोपीला भादंविच्या कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत जन्मठेप व ३० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ वर्षे अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. या अपीलावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या मताचे समर्थन केले.अंकुश अशोक रामटेके (२८) असे आरोपीचे नाव असून तो गोंदिया येथील रहिवासी आहे. त्याचे शहरातीलच एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. मुलीने प्रतिसाद न दिल्यामुळे तो चिडला होता. दरम्यान, मुलीचे लग्न जुळले. साखरपुड्याची तारीख निश्चित झाली. आता ती मुलगी आपल्याला मिळणार नाही या विचाराने वेडा झालेल्या आरोपीने मुलीवर धारदार चाकूने हल्ला करून तिच्या चेहरा व दोन्ही हातांवर ३२ घाव मारले. मुलीच्या उजव्या हाताचे एक आणि डाव्या हाताची ३ बोटे कटून वेगळी झाली. ही घटना १७ जानेवारी २००९ रोजी घडली होती. त्यावेळी मुलगी २१ वर्षांची होती.--------------------चौकट.....आरोपीला सोडण्याची विनंती फेटाळली आतापर्यंत ५ वर्षांची शिक्षा भोगल्यामुळे आरोपीला सोडून देण्याची विनंती त्याच्या वकिलाने केली होती. उच्च न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली. याशिवाय न्यायालयाने आरोपीचा पूर्व इतिहास चांगला असल्याने व तो स्वत:ही तरुण असल्यामुळे सत्र न्यायालयाच्या शिक्षेत बदल करून भादंविच्या कलम ३२६ (शस्त्राने मारणे) अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली. तरुणीला न्याय मिळण्यासाठी १० वर्षांची शिक्षा पुरेशी असल्याचे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे. दंडाची रक्कम तरुणीला दिली जाणार आहे.