शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत कोर्टात ‘तारीख पे तारीख’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 06:08 IST

बार कौन्सिल ऑफ इंडियाने नायब राज्यपालांकडे घडवून आणलेली बैठक निष्फळ ठरल्याने जिल्हा न्यायालयांमध्ये सलग सातवा दिवस ‘तारीख पे तारीख’ने गाजला.

नवी दिल्ली : बार कौन्सिल ऑफ इंडियाने नायब राज्यपालांकडे घडवून आणलेली बैठक निष्फळ ठरल्याने जिल्हा न्यायालयांमध्ये सलग सातवा दिवस ‘तारीख पे तारीख’ने गाजला. मागण्या मान्य न झाल्यामुळे वकिलांनी आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून, सर्व सहा जिल्हा न्यायालयांमधील कामकाज चांगलेच खोळंबले आहे.तीस हजारी न्यायालय परिसरात वकील-पोलिसांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाचे परिणाम आजपर्यंत सर्वसामान्य फिर्यादींना भोगावे लागत आहेत. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी याचिकाकर्त्यांना न्यायालय परिसरात प्रवेशसुद्धा देण्यात आला नव्हता. दुसऱ्या दिवसापासून प्रवेश देण्यात आला, पण सुनावणीसाठी वकिलांनी आपले प्रतिनिधी पाठवून पुढची तारीख घेण्याचे सत्र सुरू झाले. हे सत्र संपावे यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशांवरून बार कौन्सिलने नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याकडे बैठक घडवून आणली. या बैठकीत दिल्ली पोलीस व वकिलांच्या समन्वय समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, या बैठकीतून कुठलाही मार्ग निघाला नाही म्हणून आंदोलन सुरू राहील, असे समन्वय समितीचे महासचिव धीरसिंह कसाना यांनी स्पष्ट केले. ‘आम्ही पूर्ण सहकार्य करायला तयार असताना वकिलांवर गोळी झाडणाºया पोलिसांना अटक करण्यात आली नाही. आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे ते म्हणाले.>चर्चा सुरूच राहणारन्यायालयीन चौकशी सुरू असल्यामुळे कारवाई करता येणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी मांडली होती. चौकशी पूर्ण झाल्यावरच आरोपींवर कारवाई करता येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. वकील आणि पोलीस यांच्यातील चर्चा कायम ठेवण्याचे आवाहन नायब राज्यपालांनी केले. वकिलांसोबत चर्चा सुरू ठेवण्यासाठी न्यायालयाच्या आदेशांनुसार दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक टीम नियुक्त करण्यात आली आहे.