शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ईदच्या दिवशी गळाभेट घेणं इस्लाममध्ये निषिद्ध, दारुल उलूम देवबंदचा फतवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 13:08 IST

उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूरमध्ये इस्लामिक शिक्षण  देणारी संस्था दारुल उलूम देवबंदनं ईदच्या पार्श्वभूमीवर फतवा जारी केला आहे.

सहारनपूरः उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूरमध्ये इस्लामिक शिक्षण  देणारी संस्था दारुल उलूम देवबंदनं ईदच्या पार्श्वभूमीवर फतवा जारी केला आहे. ईदच्या दिवशी एकमेकांची गळाभेट घेणं हे इस्लामच्या विरोधात आहे. दारूल उलूम देवबंदचा फतवा आता चर्चेचा विषय ठरला आहे. दारूल उलूम देवबंदच्या खंडपीठाला पाकिस्तानच्या एका व्यक्तीनं प्रश्न विचारला की, ईदच्या दिवशी गळाभेट घेणं हे मोहम्मद साहेबांच्या तत्त्वात बसते काय, त्यावर देवबंदनं ते त्यांच्या तत्त्वात बसत नसल्याचं सांगितलं आहे.तसेच जर कोणी गळाभेट घेण्यासाठी आले तर काय करावे, त्यावर देवबंदनं सांगितलं की, जर असं कोणी करत असल्यास त्याला विनम्रतेनं थांबवावं. परंतु बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या व्यक्तीचा गळाभेट घेण्यास काहीच हरकत असल्याचंही देवबंदनं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही दारूल उलूम देवबंदनं असाच फतवा काढला होता. मोबाइलवर कोणत्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणं संस्थेकडून गुन्हा ठरवण्यात आले आहे. मोबाइलवर आवाज रेकॉर्ड करणं सर्वसामान्य गोष्ट आहे आणि कित्येक मोबाइल सेटमध्ये ऑटो रेकॉर्डिंगचीदेखील व्यवस्था असते.आपला आवाज रेकॉर्ड होतोय ही बाब संवाद साधणाऱ्या व्यक्तीच्या लक्षातही येत नाही. दारूल उलूमच्या फतवा विभागाच्या खंडपीठातील मुफ्ती ए कराम यांनी यावर उत्तर देताना सांगितले होते की, इस्लाम धर्मात आपापसातील संभाषण ही त्यांची खासगी बाब असते, असे मानले जाते. इस्लाममध्ये अशा संभाषणांचे रेकॉर्डिंग करून अन्य लोकांना ऐकवणे किंवा त्यांची खिल्ली उडवणे चुकीचे मानले जाते. त्यामुळे परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणं उचित नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. 

टॅग्स :Muslimमुस्लीम