शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"आमचं चुकलं, १५० लोकांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी माफी मागितली"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 15:04 IST

मला एअरपोर्टवरून परत पाठवल्याच्या घटनेवरून एप्रिल २०२२ मध्ये मोदींनी माफी मागितली होती असं धालीवाल म्हणाले

नवी दिल्ली - अमेरिका बेस्ड एनआरआय उद्योगपती आणि प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार विजेते दर्शन सिंह धालीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. पंतप्रधान मोदींनी १५० लोकांसमोर माझी माफी मागितली आणि आमच्याकडून मोठी चूक झाली असं म्हटल्याचं उद्योगपती दर्शन सिंह धालीवाल यांनी सांगितले आहे. 

मला एअरपोर्टवरून परत पाठवल्याच्या घटनेवरून एप्रिल २०२२ मध्ये मोदींनी माफी मागितली होती असं धालीवाल म्हणाले. इंग्रजी वृत्तपत्र द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. धालीवाल यांनी सांगितले की, पंतप्रधान म्हणाले, आमच्याकडून मोठी चूक झाली, तुम्हाला परत पाठवलं. परंतु तुमचा मोठेपणा आहे जे आमच्या सांगण्यावरून तुम्ही परत आला असं त्यांनी म्हटलं. 

राजधानी दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलनात लंगर व्यवस्था करण्याच्या आरोपावर दर्शन सिंह धालीवाल यांना २३- २४ ऑक्टोबरच्या रात्री दिल्ली एअरपोर्टवरून बाहेर पाठवले होते. मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार मिळाल्यानंतर धालीवाल यांनी ही मुलाखत दिली. एप्रिल २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारी निवासस्थानी एका शिख शिष्टमंडळाच्या भेटीवेळी हा संवाद झाला. या बैठकीत जगातील सर्व शिख व्यावसायिकांनी सहभाग घेतला होता. इंजिनिअरींग शिक्षण घेतल्यानंतर १९७२ मध्ये अमेरिकेला गेलेले धालीवाल अमेरिकेत फ्यूल स्टेशन चालवतात. 

अधिकाऱ्यांनी दिले होते २ पर्यायफ्लाईटमधून परत पाठवण्याच्या त्या घटनेचा उल्लेख करत दर्शन सिंह धालीवाल यांनी म्हटलं की, एअरपोर्टवर अधिकाऱ्यांनी मला २ पर्याय दिले होते. पहिला लंगर थांबवा आणि शेतकऱ्यांसोबत मध्यस्थी करा आणि दुसरा पर्याय परत अमेरिकेला जाण्याचा. माणुसकीच्या दृष्टीने मी शेतकरी आंदोलनात माझ्याकडून लंगरची व्यवस्था केली होती. डिसेंबर २०२१ रोजी जेव्हा शेतकरी दिल्ली आले होते तेव्हा मध्यरात्री पाऊस सुरू झाला. मी हा व्हिडिओ पाहिला. थंडीत ते पाण्यात झोपत आहेत. तेव्हा मला त्यांची मदत करावी वाटलं. त्यासाठी मी लंगर आणि राहण्यासाठी टेंटची सोय केली. लोकांच्या हितासाठी मी हे काम केले. त्यात कुठलेही राजकारण नव्हते असं त्यांनी सांगितले. 

भारत सरकारने मला परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता आणि आज नियतीने मला पुन्हा परत बोलावून सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केला. ही देवाची कृपा आहे. पंजाब सरकारकडून अनेक पुरस्कार मिळालेत. परंतु केंद्र सरकारकडून हा पहिलाच पुरस्कार असल्याचं दर्शन सिंह धालीवाल यांनी म्हटलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन