शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दर्डा महत्त्वाचे- सुधारित- याआधीची बातमी जोडलेली आहे. भारत अतिरेकी संघटनांच्या कायम निशाण्यावर? कटांची माहितीच नाही : गृह राज्यमंत्री चौधरी यांची विजय दर्डा यांच्या प्रश्नावर कबुली

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

नवी दिल्ली : भारत दीर्घकाळापासून अतिरेकी संघटनांच्या निशाण्यावर आहे. अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणण्याच्या अतिरेक्यांच्या कोणत्याही कटाबाबत गुप्तचर यंत्रणाकडे विशिष्ट अशी माहिती उपलब्ध नाही, अशी कबुली गृह राज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी राज्यसभेत दिली. खा. विजय दर्डा यांनी त्याबाबत प्रश्न विचारला होता.

नवी दिल्ली : भारत दीर्घकाळापासून अतिरेकी संघटनांच्या निशाण्यावर आहे. अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणण्याच्या अतिरेक्यांच्या कोणत्याही कटाबाबत गुप्तचर यंत्रणाकडे विशिष्ट अशी माहिती उपलब्ध नाही, अशी कबुली गृह राज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी राज्यसभेत दिली. खा. विजय दर्डा यांनी त्याबाबत प्रश्न विचारला होता.
3 सप्टेंबर 2014 रोजी अल-कायदाच्या शेख अयाम अल जवाहिरी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. त्यात भारतीय उपखंडात अल-कायदाची ‘एक्यूआयएस’ ही नवी शाखा स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. 29 जून 14 रोजी इंटरनेटवर अपलोड करण्यात आलेल्या एका व्हिडिओत अबू बकर अल बगदादी याने भारतासह विविध देशांमधील मुस्लिमांची कथित दुर्दशा मांडली होती. विविध अतिरेकी संघटना भारताच्या कानाकोपर्‍यात स्फोट घडविण्याची धमकी देत आल्या आहेत. अशा संघटनांची ओळख पटवण्यात आली काय? बर्दवान स्फोटाचा गुंता सुटला आहे काय? या स्फोटांमधील दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली? असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला होता. त्यावर चौधरी म्हणाले की, राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या स्फोटाचा तपास करीत आहे. आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले, जखमी झालेले लोक जमात-उल-मुजाहिदीन बांगला देश (जेएमबी) सदस्य होते.
--------------
बँक एटीएमच्या लुटीची आकडेवारी नाही
गेल्यावर्षी देशभरातील किती बँक एटीएममध्ये लुटमारीच्या घटना घडल्या याची माहिती केंद्र सरकारकडे नसल्याचे गृह राज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी अन्य एका उत्तरात दिली.
बँकांच्या एटीएमवर होणारी चोरी किंवा दरोड्याच्या घटनांची आकडेवारी केंद्रीय स्तरावर ठेवली जात नाही. 2012 मध्ये बँकांवर दरोड्याच्या एकूण 29 घटना घडल्या. लुटमारीचे 191 गुन्हे दाखल झाले. 2013 मध्ये दरोड्याची 28 प्रकरणे तर लुटमारीच्या 48 घटनांची नोंद झाली, असे चौधरी यांनी लेखी उत्तरात सांगितले. अलीकडेच बँक एटीएममध्ये लूट आणि आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सरकारला याबाबत माहिती आहे काय? बँक एटीएम लुटण्याच्या किती घटना घडल्या याची सरकारकडे माहिती उपलब्ध आहे काय? लुटण्यात आलेल्या रकमेचा भारतविरोधी मोहिमेसाठी वापर केला जातो काय? याबाबत माहिती जाणून घेण्याची इच्छा खा. दर्डा यांनी व्यक्त केली होती.