शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चारधाम यात्रा सुरु होण्यापूर्वीच धोकादायक व्हायरस सापडला; उत्तराखंड अलर्ट मोडवर, क्वारंटाईन सेंटर सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 22:12 IST

येत्या ३० एप्रिलला चारधाम यात्रा सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्राण्यांमध्ये व्हायरस सापडल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.

चारधाम यात्रा सुरु होण्यापूर्वीच मोठी खळबळ उडाली आहे. यात्रेकरूंकडून साहित्य आणि प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या घोडे आणि खेचरांमध्ये धोकादायक एक्वाईन इन्फ्लुएन्झा व्हायरस सापडला आहे. यामुळे उत्तराखंड सरकारमध्ये धावपळ उडाली असून तातडीने दोन क्वारंटाईन सेंटर सुरु करण्यात आले आहेत. 

येत्या ३० एप्रिलला चारधाम यात्रा सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्राण्यांमध्ये व्हायरस सापडल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. रुद्रप्रयाग जिल्ह्यात दोन क्वारंटाईन सेंटर सुरु करण्यात आले आहेत. 

अक्षय्य तृतीयेला गंगोत्री-यमुनोत्रीचे दरवाजे उघडले जाणार आहेत. तर केदारनाथ धामचे २ मे रोजी दरवाजे उघडले जाणार आहेत. त्यानंतर दोन दिवसांनी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जाणार आहेत. घोड्यांमध्ये सापडलेल्या व्हायरसमुळे आरोग्य विभाग आणि पशुपालन विभाग सतर्क झाला आहे.  मंत्री सौरभ बहुगुणा यांनी तातडीने विभागाची बैठक बोलवून खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. 

१२ घोड्यांमध्ये हा व्हायरस सापडला आहे. यामुळे प्राण्यांची तपासणी करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत. तसेच निष्काळजी काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही आजारी घोड्याला किंवा खेचराला चारधामला नेण्याची परवानगी दिली जाणार नाही. चारधाम यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. महाकुंभामुळे देशात भक्तीमय वातावरण तयार झाल्याने गेल्या वेळेचा विक्रम मोडला जाईल असा अंदाज आहे. 

टॅग्स :Healthआरोग्य