शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीच्या ‘डोंगरा’तून निघाला ‘उंदीर’, वाचा धक्कादायक आकडेवारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 07:39 IST

१५.४१ लाख कोटी बाद केले; १५.३१ लाख कोटी परत आले, नव्या नोटांसाठी १२,८७७ कोटी रुपयांचा खर्च

मुंबई : नोटाबंदीवेळी चलनातून बाद केलेल्या १५.४१ लाख कोटी रुपयांपैकी १५.३१ लाख कोटी रुपये बँकेत परत आल्याचे रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात समोर आले आहे. केवळ १०,७२० कोटी रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे आल्या नाहीत. केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ ला ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यावेळी एकूण १७.९७ लाख कोटी रुपये चलनात होते. त्यापैकी ८६ टक्के नोटा ५०० व १००० रुपयांच्या होत्या. यातील ३ लाख कोटी रुपये ‘काळा पैसा’ असल्याचे सांगून ती रक्कम चलनात येणार नाही असा दावा सरकारने केला होता. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या अहवालाने तो फोल ठरला आहे.

नोटाबंदीनंतर (नोव्हेंबर २०१६ ते मार्च २०१७) रिझर्व्ह बँकेला ५०० व २००० रुपयांच्या नवीन नोटांच्या छपाईसाठी ७,९६५ कोटी रुपये खर्च करावे लागले. २०१७-१८ मध्येही रिझर्व्ह बँकेला नोटांच्या छपाईपोटी ४,९१२ कोटी रुपये खर्च करावे लागले. म्हणजे १२,८७७ कोटी रुपयांचा नव्या नोटांसाठी खर्च आला आहे. रिझर्व्ह बँकेने या अहवालात महागाई दरात वाढीची शक्यताही व्यक्त केली आहे. २०१८-१९ च्या अखेरीस महागाई दर ४.९ टक्के व २०१९-२० च्या सुरूवातीला ५ टक्क्यांवर जाईल. तसेच आर्थिक विकास दर (जीडीपी) ६.७ वरुन ७.४ पोहोचला आहे.निश्चलीकरण फेलनोटाबंदीतील ३ लाख कोटी रुपये बँकिंग प्रणालीत परत येणार नाहीत, असा दावा केंद्र सरकारने केला होता. वास्तवात सर्व रक्कम परत आली व निश्चलीकरण फक्त १३ हजार कोटी रुपयांचे झाले, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे. या अयशस्वी नोटाबंदीमुळे देशाचे २.२५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. १०० नागरिकांना प्राण गमवावे लागले. हजारो छोटे उद्योग बंद पडले. १५ कोटींचा रोजगार बुडाला, असे चिदंबरम यांनी ट्विटरवर म्हटले आहे.99.30%रक्कम बँकेत परत

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरण