नवी दिल्ली : घटनेतील तत्त्वे आणि तरतुदींपासून फारकत घेतली तर देशाची लोकशाही चौकट कमजोर होईल आणि नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हिताला सुरुंग लागेल, असा इशारा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिला आहे. ४६ व्या राज्यपाल संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुखर्जी बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रपती आणि राज्यघटनाहा शासनाला चौकट पुरविणारा एकमेव मार्गदर्शक दस्तऐवज आहे. राज्यपालांनी शांतता आणि धार्मिक सलोखा राखला जाईल याची खबरदारी घ्यायला हवी. या दोन दिवसीय संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य कॅबिनेट मंत्री उपस्थित होते.
घटनेतील तत्त्वांपासून फारकत धोक्याची
By admin | Updated: February 12, 2015 02:54 IST