शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: आंबेडकरांच्या भगव्या रंगातील पुतळ्याला बसपाच्या कार्यकर्त्यांनी दिला निळा रंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 12:16 IST

याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

बदाऊन: उत्तर प्रदेशच्या दुगरय्या येथे विटंबना करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पुनर्स्थापनेनंतर नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. दोन दिवसांपूर्वी या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. पोलिसांनी याठिकाणी तात्काळ नवा पुतळा उभारला होता. मात्र, या पुतळ्याच्या भगव्या रंगाच्या शेरवानीवरून स्थानिक लोकांमध्ये संताप निर्माण झाला होता. त्यानंतर आता बसपाच्या कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी जाऊन परस्पर हा पुतळा निळ्या रंगाने रंगवला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तत्पूर्वी स्थानिकांकडून योगी सरकारच्या या 'भगवीकरणा'वर स्थानिकांकडून जोरदार टीका करण्यात आली. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या शेरवानीचा रंग पाहून लोक संतप्त झाले आहेत. आतापर्यंत आपण नेहमीच गडद रंगाचा ब्लेझर आणि ट्राऊझर अशा विदेशी पेहरावातील बाबासाहेबांचे पुतळे पाहिले आहेत. त्यामुळे या पुतळ्याच्या शेरवानीचा भगवा रंग अनेकांना खटकत आहे. त्यामुळे हा पुतळा पुन्हा रंगवण्यात यावा, अशी मागणी आरक्षण बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी भारत सिंग जाटव यांनी केली होती. गेल्या काही दिवसांमध्ये दलित अत्याचारविरोधी (अॅट्रॉसिटी) कायद्यात झालेल्या बदलांमुळे दलित समाजात संतप्त वातावरण आहे. याशिवाय, गेल्या आठवड्यात योगी सरकारने डॉ. भीमराव आंबेडकर ही नाव लिहण्याची प्रचलित पद्धत बदलून त्यामध्ये 'रामजी' (डॉ. बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव) शब्द लिहण्याची अधिकृत सक्ती केली होती. या सगळ्यामुळे सध्या दलित समाजात सरकारविरोधी वातावरण निर्माण झाले आहे.  

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरyogi adityanathयोगी आदित्यनाथ