शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरून काढणे शक्य; पण जीवितहानी नाही - ली ब्रानस्टेटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 07:55 IST

Lee Branstator : कार्नेगी मेलन  विद्यापीठाचे प्राध्यापक ब्रानस्टेटर यांनी आशियाच्या परिदृश्यातून आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था आणि औद्योगिक संस्थांचा अभ्यास केला आहे.

ठळक मुद्देकोरोना महामारीने झालेले आर्थिक नुकसान भरून काढता येईल; पण  जीवितहानी भरून काढणे शक्य नाही, असे मत अर्थशास्त्राचे प्राध्यापक ली ब्रानस्टेटर यांनी व्यक्त केले.

- अंकिता देशकर

नागपूर : भारतीय अर्थव्यवस्था दुप्पट अंकी दराने वाढेल असे कधी झाले नाही. त्यामुळे २०२१-२२ या आर्थिक वर्षात ११.५ टक्के वाढ होईल या निर्धारित लक्ष्याच्या तुलनेत ८ ते ९ टक्क्यांनी जीडीपी वाढेल अशी शक्यता अनेक अर्थतज्ज्ञ व मूल्यांकन संस्थांनी व्यक्त केली आहे. कोरोना महामारीने झालेले आर्थिक नुकसान भरून काढता येईल; पण  जीवितहानी भरून काढणे शक्य नाही, असे मत अर्थशास्त्राचे प्राध्यापक ली ब्रानस्टेटर यांनी व्यक्त केले.कार्नेगी मेलन  विद्यापीठाचे प्राध्यापक ब्रानस्टेटर यांनी आशियाच्या परिदृश्यातून आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था आणि औद्योगिक संस्थांचा अभ्यास केला आहे. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी महामारीच्या काळात खालावलेल्या आर्थिक घडामोडींवर प्रकाश टाकला.  त्यांनी चीनचे उदाहरण दिले. चीन हे कोरोनाचे उगमस्थान होते. जगभरातून टीका होत असली तरी चीन सरकारने देशावरील संकट प्रभावीपणे निस्तारले.  ब्रानस्टेटर म्हणाले, यावेळी लस ही आर्थिक विकासाची चावी आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेची अर्थव्यवस्था यावर्षी ५ टक्क्यांनी वाढेल.

महामारीतून धडा घेणे आवश्यक भारतासारख्या विकसनशील देशाबाबत बोलताना ब्रानस्टेटर म्हणाले, जागतिक जीडीपीमध्ये अशा देशांचा सहभाग मोठा आहे. त्यामुळे अशा विकसनशील देशांची संथ गतीने वाढ आणि आर्थिक मंदी जगावर परिणाम करणारी असते. अशा अर्थव्यवस्थेची वाढ वेगाने होईल. जागतिक समुदायाने या महामारीतून धडा घेणे आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञांचा इशारा लक्षात घेऊन आधीच सावध राहणे गरजेचे आहे. भविष्यातील अर्थव्यवस्था ही भूतकाळाच्या परिस्थितीप्रमाणे तंतोतंत राहील ही शक्यता गृहीत धरू नये. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या