शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मंदिरात आलेल्या दलित तरुणाला नग्नावस्थेत फिरवलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 14:25 IST

कर्नाटकताल्या चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेटमध्ये पुजारी आणि ग्रामस्थांनी एका दलित तरुणाला शनिश्वर मंदिरात नग्नावस्थेत फिरवलं.

चामराजनगरः कर्नाटकात दलित अत्याचाराचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकताल्या चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेटमध्ये पुजारी आणि ग्रामस्थांनी एका दलित तरुणाला शनिश्वर मंदिरात नग्नावस्थेत फिरवलं. तो दलित तरुण देवाच्या मूर्तीला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण 3 जून रोजीचं आहे. घटनेसंदर्भात मंदिरातले पुजारी चंद्रप्पा म्हणाले, तो मंदिरात आला तेव्हा मी त्याला पाणी दिलं. त्याला मंदिरात यायचं होतं. मी त्याला बोलावलं पण त्यानं माझी कॉलर पकडली. कारण नसताना मला शिवीगाळ करू लागला. तो मंदिरात आला तेव्हा त्याच्या अंगावर कपडे नव्हते. मी त्याला लुंगी दिली. असं वाटत होतं की, त्याची मानसिक परिस्थिती ठीक नाही. तर दुसरीकडे तरुणाच्या भावानं पुजारी आणि ग्रामस्थांनी त्याला नग्नावस्थेत फिरवल्याचं म्हटलं आहे.त्यानंतर पीडित मुलाचा भाऊ कांता राजू याच्या तक्रारीवर भारतीय दंड संहिता कलम 143, 147, 395, 323, 342 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पुजारी आणि एका स्थानिकाला अटक करण्यात आली आहे, तर इतर आरोपी फरार आहेत. जमावानं त्या दलित तरुणाला मारहाणही केली, तो तरुण परीक्षेसाठी म्हैसूरला गेला होता. त्याचदरम्यान राघवपूर गावात त्याच्या बाइकला अपघात झाला आणि त्याला तिकडेच लुटण्यात आलं. त्यानंतर तो मंदिरात गेला आणि ही दुर्घटना घडली. त्या तरुणाच्या वडिलांनी एक प्रमाणपत्र दिलं असून, त्यात तरुण मानसिक रुग्ण असल्याचं म्हटलं आहे.