शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

सरबजीत सिंग यांची बहीण दलबीर कौर यांचे निधन; पाकिस्तानात कैद असलेल्या भावाला भारतात आणण्यासाठी उभारला होता लढा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 09:35 IST

Dalbir Kaur : पंजाबमधील रहिवासी सरबजीत सिंग यांना पाकिस्तानातून भारतात परत आणण्यासाठी दलबीर कौर यांनी मोहीम सुरू केली होती.

चंडीगड : हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू झालेल्या सरबजीत सिंग (Sarabjit Singh) यांची बहीण दलबीर कौर (Dalbir Kaur) यांचे शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. 60 वर्षीय दलबीर कौर यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका (cardiac arrest)असल्याचे सांगण्यात येत आहे. पंजाबमधील रहिवासी सरबजीत सिंग यांना पाकिस्तानातून भारतात परत आणण्यासाठी दलबीर कौर यांनी मोहीम सुरू केली होती. मिळालेल्या माहितीनुसार दलबीर कौर यांच्या पार्थिवावर आज पंजाबमधील भिखीविंडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सरबजीत सिंग यांना  पाकिस्तानी न्यायालयाने दहशतवाद आणि हेरगिरीसाठी दोषी ठरवले होते आणि 1991 मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, 2008 मध्ये सरकारने सरबजीत सिंग यांच्या फाशीला अनिश्चित काळासाठी स्थगिती दिली होती. यानंतर एप्रिल 2013 मध्ये लाहोरमध्ये कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात सरबजीत सिंग यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, सरबजीत सिंग यांनी पाकिस्तानमध्ये दावा केला होता की, ते एक शेतकरी आहेत आणि त्यांचे सीमेजवळ घर आहे. ते चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले, मात्र त्यांना अटक करण्यात आली. यानंतर त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सरबजीत सिंग यांची बहीण दलबीर कौर डिसेंबर 2016 साली भाजपमध्ये सामील झाल्या होत्या. सरबजीत सिंग यांच्या सुटकेसाठी दलबीर कौर यांनी मोठा लढा उभारला होता. तसेच, सरबजीत सिंग यांच्या जीवनावर बॉलिवूडमध्ये एक चित्रपट बनवण्यात आला होता. या चित्रपटात सरबजीत सिंग यांची भूमिका अभिनेता रणदीप हुड्डाने केली होती तर दलबीर कौर यांची भूमिका ऐश्वर्या रायने केली होती.

टॅग्स :Punjabपंजाब