शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून दररोज शस्त्रसंधीचे उल्लंघन

By admin | Updated: May 8, 2017 01:35 IST

मागच्या दोन वर्षांत (२०१५-२०१६) जम्मू-काश्मीरस्थित नियंत्रणरेषेलगत दररोज पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

नवी दिल्ली : मागच्या दोन वर्षांत (२०१५-२०१६) जम्मू-काश्मीरस्थित नियंत्रणरेषेलगत दररोज पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. तसेच गेल्या पाच वर्षांत दर दुसऱ्या दिवशी दहशतवादी घटना घडल्या असून, २०१२ ते २०१६ दरम्यान घडलेल्या १,१४२ दहशतवादी घटनांत २३६ सुरक्षा कर्मचारी शहीद आणि ९० निरपराध नागरिक ठार झाले.माहिती अधिकार कायद्यातहत गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१५ मध्ये नियंत्रणरेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानच्या बाजूने हल्ला करण्याच्या ४०५ घटना घडल्या. यात दहा सुरक्षा कर्मचारी शहीद झाले. २०१६ मध्ये नियंत्रणरेषेसह इतर ठिकाणी अशा ४४९ घटना घडल्या. यात १३ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले. गेल्या पाच वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये किती दहशतवादी घटना घडल्या आणि त्यात किती जवान शहीद झाले व किती नागरिक मारले गेले, याची माहिती विचारण्यात आली होती. पाकिस्तान सातत्याने भारताविरुद्ध छुपे युद्ध करीत आहे, असे सेवानिवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी यांनी सांगितले. आता तर नवीन प्रकार सुरू झाला आहे. सुरक्षा दले जेव्हा दहशतवाद्यांना घेरतात, तेव्हा सोशल मीडियावर संंदेश पाठवून लोक त्या ठिकाणी जमा होतात. त्यामुळे सुरक्षा दलाला कारवाई करणे कठीण होते. (वृत्तसंस्था)२०१२ ते २०१६ या पाच वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये घडलेल्या १,१४२ दहशतवादी घटनांत २३६ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले. या अवधीत सुरक्षा दलाशी उडालेल्या चकमकीत ५०७ दहशतवादी ठार झाले. २०१२ मध्ये २२० घटनांत १५ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले, तर १५ नागरिक ठार झाले, तर सुरक्षा दलाने प्रतिहल्ला करून ७२ दहशतवाद्यांचा खात्मा केला.२०१३ मध्ये दहशतवादी हिंसाचाराच्या १७० घटना घडल्याची माहिती समोर आली असून, यात ५२ जवान शहीद, तर १५ नागरिक ठार झाले. सुरक्षा दलाने चोख उत्तर देत ६७ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. २०१४ मध्ये अशा २२२ घटना घडल्या असून, यात ४७ जवान शहीद, तर २८ नागरिकांचा बळी गेला. सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ११० दहशतवादी मारले गेले. २०१६ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाही हिंसाचाराच्या ३२२ घटना घडल्या; यात ८२ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले, तर १५ नागरिक ठार झाले. सुरक्षा दलाने १५० दहशतवाद्यांना खात्मा केला.