शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडीचे प्रकरण पुन्हा मुंबई हायकोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:28 IST

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दहीहंडी प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे नव्याने विचारार्थ पाठवले. न्या. कुरीयन जोसेफ व न्या. आर. भानुमती यांच्या खंडपीठाने महाराष्ट्रात दहीहंडी किती उंचीची असावी...

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दहीहंडी प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे नव्याने विचारार्थ पाठवले. न्या. कुरीयन जोसेफ व न्या. आर. भानुमती यांच्या खंडपीठाने महाराष्ट्रात दहीहंडी किती उंचीची असावी व त्यात भाग घेणा-यांचे वय किती असावे यावरील निर्बंध काढायचे की नाहीत याचा निर्णय आता मुंबई हायकोर्टात घ्यावा, असे नमूद केले.राज्य सरकारने सादर केलेल्या शपथपत्रावर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. त्या शपथपत्रात, महाराष्ट्र पोलिसांनी दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी संघटकांना गाद्यांची व्यवस्था करावी, असे सांगण्यात आले आहे. सहभागी होणाºयांची सुरक्षितता, छातीचे संरक्षणाचे साधन आणि सुरक्षिततेचे पट्टे द्यावेत. दहीहंडीत भाग घेणाºया सगळ्यांची नावनोंदणी सुरक्षेच्या उद्देशासाठी केली जावी, असे म्हटले आहे. या मार्गदर्शक सूचनांत प्रत्येक ठिकाणी बळकट अशा नायलॉनच्या दोरखंडाचा वापर केला जावा. प्रथमोपचार आणि रुग्णवाहिकाही कार्यक्रमाच्या स्थळी उपलब्ध केलेल्या असाव्यात, असे म्हटले आहे. जखमी झाल्यास त्यांना वैद्यकीय सेवा दिली जावी व त्यांना रुग्णालयात पाठवले जावे, याचाही उल्लेख शपथपत्रात आहे. न्यायालयाने १८ वर्षांच्या खालील मुलांना दहीहंडीत भाग घ्यायला बंदी घातली आहे व दहीहंडीची उंचीही २० फुटांपर्यंतच मर्यादित केली आहे.