शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्यावर संशय असल्याने सिलेंडर डोक्यात घालून पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 14:59 IST

एका व्यक्तीने सासरी जाऊन पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करत आणि सिलेंडर डोक्यात घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

ठळक मुद्देधारदार शस्त्राने हल्ला करत आणि सिलेंडर डोक्यात घालून हत्या करुन हत्या करण्यात आली होतीमृत महिलेची दोन्ही मुलं या हत्येची साक्षीदार आहेतपोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे

नवी दिल्ली, दि. 8 - एका व्यक्तीने सासरी जाऊन पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करत आणि सिलेंडर डोक्यात घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण पूर्व जिल्ह्यातील बदरपूर परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी हत्या केल्याच्या आरोपाखाली पती प्रवीणला अटक केली आहे. मृत महिलेची दोन्ही मुलं या हत्येची साक्षीदार आहेत. 

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता पोलिसांना बदरपूरमधील गौतमपुरी कॉलनीत एका महिलेची हत्या केल्याचा फोन आला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचं दिसलं. महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचं स्पष्ट दिसत होतं. 

पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मिनाक्षी असं या मृत महिलेचं नाव आहे. महिलेच्या माहेरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पती प्रवीणनेच तिची हत्या केली आहे. 

हत्या केल्यानंतर आरोपी पतीने घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी संभाव्य ठिकाणी छापेमारी करत आरोपी पतीला अटक केली आहे. चौकशीदरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, 12 वर्षांपुर्वी प्रवीणचं मिनाक्षीसोबत लग्न झालं होतं. त्यांना 10 आणि चार वर्षाची दोन मुलं आहेत. प्रवीणचा ड्रायव्हर म्हणून नोकरी करतो. आपली पत्नी आणि मुलांसोबत एका भाड्याच्या घरात तो राहत होता. गौतमपुरी भागात मिनाक्षीचं माहेर आहे. माहेर जवळ असल्याने अनेकदा ती जात असते. 

प्रवीण मात्र नेहमी तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरुन दोघांमध्ये भांडण होत असेल. 5 ऑगस्ट रोजी मिनाक्षी आपल्या माहेरी आली होती. दुपारी प्रवीण तिथे पोहोचला. कोणाला काही कळण्याआधीच त्याने मिनाक्षीवर धारदार शस्त्राने वार करत हल्ला करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर सिलेंडरही पत्नीच्या डोक्यात घातला. हे सर्व त्यांच्या दोन मुलांच्या डोळ्यांदेखत झालं. हत्येनंतर गोंधळ सुरु झाला, आणि प्रवीणने घटनास्थळावरुन पळ काढला.