सिलिंडरच्या सबसिडीचे गोलमाल - जोड
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
::::चौकट:::
सिलिंडरच्या सबसिडीचे गोलमाल - जोड
::::चौकट:::एजन्सीची टोलवाटोलवीगॅस एजन्सीच्या कार्यालयात या प्रकरणी विचारणा केली असता, एका जबाबदार कर्मचाऱ्याने सबसिडीची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे सांगितले. बँकेत जाऊन चौकशी करण्यास सांगितले. मात्र बँकेत रक्कम जमा झाली नसल्याचे सांगताच, तुमचे दुसऱ्या बँकेत खाते असेल तर तिथे जमा झाली असेल असे त्यांनी सांगितले. आधारशी लिंक केलेल्या बँकेत यापूर्वी सबसिडीची रक्कम जमा झाली होती. असे सांगितल्यावर तुम्ही बँकेलाच विचारा, असे सांगून त्यांनी हात झटकले. :::चौकट:::बँकेकडूनही अपेक्षाभंगया प्रकरणी बँकेकडे विचारणा केली असता, सबसिडीची रक्कम कंपनीच्या विभागीय कार्यालयाकडून जमा होत असून, तिथे विचारणा करण्यास सांगितले. ::::चौकट:::विभागीय कार्यालयाने दाखविले एजन्सीकडे बोटइंडियन गॅसच्या विभागीय कार्यालयाचे विक्री अधिकारी निपाने यांना या प्रकरणी विचारणा केली असता, त्यांनी गॅस एजन्सीकडे विचारणा करण्यास सांगितले. गॅस एजन्सीकडून काही चूक झाली असेल, त्यामुळे खात्यात पैसे जमा झाले नसतील. एजन्सीलाच विचारा, असे त्यांनी सांगितले. :::::चौकट::::गॅस सबसिडीच्या प्रकरणाची जिल्हा पुरवठा विभागाचा संबंध नाही. सिलिंडरची सबसिडी नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) व गॅस कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांच्या खात्यात जमा होते. सध्या सबसिडीचे अनेक प्रकरण विभागाकडे येत आहेत. यासंदर्भात ग्राहकांनी गॅस कंपनी अथवा बँकेकडेच विचारणा करावी. रमेश बेंडे, अन्न धान्य वितरण अधिकारी, नागपूर शहर:::::::चौकट:::::ग्राहकांची फरफटसबसिडी जमा होत नसल्यामुळे, ग्राहकांकडून एजन्सीला विचारणा केली जाते. एजन्सीकडूनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने, ग्राहकांना नेमके कुठे जावेच कळत नाही. सबसिडीसाठी ग्राहक बँक आणि एजन्सीच्या चकरा मारत आहे. मात्र कुठेही त्याचे समाधान होत नसल्याने, तो वैतागून या योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे.