शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Cyclone Mocha: १७५ किमी प्रतितास वेग; आज बांग्लादेश अन् म्यानमार किनारपट्टीवर मोचा चक्रीवादळ धडकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 10:00 IST

Cyclone Mocha: अंदमान समुद्रात सुरु झालेल्या मोचा चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे.

नवी दिल्ली: अंदमान समुद्रात सुरु झालेल्या मोचा चक्रीवादळाचे (Cyclone Mocha) तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे वादळ सध्या कॉक्स बाजारच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे ७०० किमी अंतरावर आहे. गेल्या ६ तासात हे चक्रीवादळ १७५ किमी प्रतितास वेगाने ईशान्येकडे हळूहळू सरकत आहे. हे वादळ आज दुपारच्या सुमारास कॉक्स बाजार (बांग्लादेश) आणि क्यवप्यूमधील (म्यानमार)  किनारपट्टीवर आदळण्याची  शक्यता आहे. 

मोचा या शक्तिशाली चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेश आणि म्यानमारमधील अधिकाऱ्यांनी किनारपट्टी भागातील हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आणि किनारी भागांपासून दूर राहण्याचा इशारा दिला. हे वादळ अतिशय वेगाने किनारपट्टीवर धडकेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी बांगला देश आणि म्यानमारने तयारी केली असून, किनारपट्टी भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये NDRF तैनात-

पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा येथील बक्खली बीचवर नागरी संरक्षण दल तैनात करण्यात आले आहे. नागरी संरक्षण अधिकारी अनमोल दास म्हणाले, "परिस्थिती चांगली नाही. आम्ही लोकांना आणि पर्यटकांना सतत सतर्क राहण्याचा आणि समुद्रकिनाऱ्यावर येण्याचे टाळण्याचा इशारा देत आहोत." यापूर्वी, चक्रीवादळ 'मोचा' चे तीव्र वादळात रूपांतर होण्याचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) पश्चिम बंगालच्या दिघामध्ये ८ टीम आणि २०० बचाव कर्मचारी तैनात केले आहेत. 

८ ते १२ फूट उंचीपर्यंत लाटा उसळणार-

चक्रीवादळातून ८ ते १२ फूट उंचीच्या लाटा उसळू शकतात. उत्तर म्यानमारच्या सखल भागात पूर, भूस्खलनाची भीती देखील वर्तवण्यात आली आहे. चितगाव बंदरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय विद्यापीठात रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

टॅग्स :cycloneचक्रीवादळBangladeshबांगलादेशMyanmarम्यानमार