शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
4
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
5
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
6
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
7
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
8
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
9
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
10
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
11
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
12
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
13
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
14
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
15
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
16
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
17
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
18
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
19
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
20
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी

Cyclone Gaja : 'तितली' नंतर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशवर 'गज' चक्रीवादळाचं संकट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 11:06 IST

'तितली' चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे 'गज' हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. तामिळनाडूचा उत्तर भाग आणि आंध्रप्रदेशाच्या दक्षिण किनारपट्टीच्या दिशेने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे.

ठळक मुद्दे'तितली' चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे 'गज' हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे.15 नोव्हेंबरला कुड्डालोर आणि श्रीहरीकोटा येथे हे चक्रीवादळ धडकण्याची शक्‍यता आहे.'गज' या चक्रीवादळामुळे  तामिळनाडूच्या काही भागात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

चेन्नई - 'तितली' चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे 'गज' हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. तामिळनाडूचा उत्तर भाग आणि आंध्रप्रदेशाच्या दक्षिण किनारपट्टीच्या दिशेने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे. 15 नोव्हेंबरला कुड्डालोर आणि श्रीहरीकोटा येथे हे चक्रीवादळ धडकण्याची शक्‍यता आहे.

'गज' चक्रीवादळ चेन्नईच्या ईशान्येकडे 860 किलोमीटर अंतरावर असून ते ताशी 12 किलोमीटर वेगाने पुढे सरकत आहे. पुढच्या 24 तासात या वादळाचे रुपांतर भीषण चक्रीवादळामध्ये होण्याची शक्‍यता आहे. तसेच ताशी 90 ते 100 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याची माहिती  हवामान विभागाने दिली आहे. विशेषतः हे वादळ तामिळनाडूतील नागपट्टणम, कुड्डालोर आणि पाँडिचेरी येथील कराईकल येथील किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. 

'गज' या चक्रीवादळामुळे  तामिळनाडूच्या काही भागात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर याच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशचा दक्षिण भाग, केरळमधील काही भागात येत्या बुधवारी जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मच्छिमारांना 12 नोव्हेंबरपासून समुद्रात न जाण्याची सूचनाही देण्यात आली होती. 

'गज' चक्रीवादळा आधी तितली चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन धडकले होते. या चक्रीवादळा दरम्यान ओडिशामध्ये प्रशासनाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. जवळपास 3 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होते. तितली हे चक्रीवादळ भयंकर असून बंगालच्या खाडीतील दक्षिण आणि पश्चिम मध्य क्षेत्राला या वादळाचा फटका बसला होता. 

टॅग्स :Cyclone Gajaगाजा चक्रीवादळCyclone Titliतितली चक्रीवादळTamilnaduतामिळनाडू