शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

Cyclone Amphan : ‘अ‍ॅम्फन’च्या तडाख्याने पश्चिम बंगालमध्ये ७२ ठार, ओडिशातही धूळधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 05:59 IST

हजारो लोक बेघर झाले असून पश्चिम बंगालच्या दीघा किनारपट्टीला धडकलेल्या या विक्राळ चक्रीवादळाने पश्चिम बंगालसोबत ओडिशातही भयंकर हैदोस घातला.

कोलकाता/भुवनेश्वर : ताशी १९५ किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासोबत धडकलेल्या ‘अ‍ॅम्फन’ चक्रीवादळाने पश्चिम बंगालमध्ये ७२ लोकांचा बळी घेत भयानक धूळधाण केली. हजारो लोक बेघर झाले असून पश्चिम बंगालच्या दीघा किनारपट्टीला धडकलेल्या या विक्राळ चक्रीवादळाने पश्चिम बंगालसोबत ओडिशातही भयंकर हैदोस घातला. वेगवान वाºयासोबत आलेल्या जोरदार पावसाने सखल भाग जलमय झाले असून मातीची घरे आणि उभी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी उभी झाडे आणि विजेचे खांब उखडून पडले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी या हानीची हवाई पाहणी करणार आहेत.पश्चिम बंगालमधील उत्तर आणि दक्षिण २४ परगणा हे दोन जिल्हे अ‍ॅम्फन चक्रीवादळाच्या तडाख्याने पूर्णत: उद्ध्वस्त झाले आहेत. ओडिशातील किनारपट्टीवरील अनेक भागांत वीज आणि दूरध्वनी सेवा ठप्प झाली असून ओडिशातील जवळपास ४४ लाखांहून अधिक लोकांना तडाखा बसला आहे. प. बंगाल आणि ओडिशात धूळधाण करणाºया या चक्रीवादळाने बांगलादेशातही १० लोक ठार झाले असून बांगलादेशातील किनारपट्टीवरील अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत.उत्तर आणि दक्षिण २४ परगणा तसेच कोलकाता बुधवारी सायंकाळपासून अंधारात आहे. दूरध्वनी आणि मोबाईल सेवाही ठप्प आहे. यावेळी चक्रीवादळाने तडाख्यात मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना दोन ते अडीच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घोषित केली.अ‍ॅम्फन चक्रीवादळग्रस्त राज्यातील लोकांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असा आश्वासक शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. पश्चिम बंगालमधील विध्वंसाची दृश्ये मी पाहिली आहेत. ही आव्हानात्मक घडी आहे. संपूर्ण देश पश्चिम बंगालच्या पाठीशी आहे, असे त्यांनी टष्ट्वीट केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी संपर्क साधून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.चक्रीवादळग्रस्त पश्चिम बंगाल आणि ओडिशातील बचाव व मदत कार्याचा राष्टÑीय संकट व्यवस्थापन समितीने दिल्लीतील बैठकीत आढावा घेतला. चक्रीवादळाची स्थिती आणि दिशा ओळखून भारतीय हवामान खात्याने अचूक अंदाज केल्याने वेळीच या दोन्ही राज्यांतील किनारपट्टी भागात एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आल्याने नुकसान कमी झाले.कॅबिनेट सेक्रेटरी राजीव गौबा यांच्या नेतृत्वाखालील समितीने या दोन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांना सांगितले की, वेळीच एनडीआरएफची पथके तैनात करून या दोन्ही राज्यांतील जवळपास ७ लाख लोकांना सुरक्षित हलविण्यात आले. त्यामुळे १९९९ मधील महाचक्रीवादळाच्या तडाख्याच्या तुलनेत जीवितहानी कमी झाली. जलदगतीने पुनर्वसन करण्यासाठी एनडीआरएफची अतिरिक्त पथके पश्चिम बंगालमध्ये विशेषत: कोलकाताकडे रवाना झाली आहेत.चक्रीवादळाच्या तडाख्याने झालेल्या जीवित आणि वित्तीय हानीचा अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. मी माझ्या आयुष्यात एवढे भयानक चक्रीवादळ आणि विध्वंस पाहिला नव्हता. केंद्राने राज्याला सर्वतोपरी मदत करावी. चक्रीवादळग्रस्त भागाचा मी लवकरच दौरा करणार आहे. या भागात पुनर्वसनाचे कामही सुरू केले जाईल. - ममता बॅनर्जी

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCyclone Amphanअम्फान चक्रीवादळOdishaओदिशाBangladeshबांगलादेश