पान 5 बोरीत बसच्या धडकेत सायकलस्वार ठार
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
दुकॉलमी वापरावी
पान 5 बोरीत बसच्या धडकेत सायकलस्वार ठार
दुकॉलमी वापरावीउपचारादरम्यान गोमेकॉत मृत्यूफोंडा : खाजोर्डा-बोरी येथे रविवारी संध्याकाळी रस्ता ओलांडणार्या देविदास काशिनाथ नाईक (55, रा. खाजोर्डा-बोरी) या सायकलस्वारास प्रवासी बसची ठोकर बसली. गंभीर जखमी अवस्थेतील देविदास नाईक यांना आधी फोंड्यातील उपजिल्हा हॉस्पिटल व तेथून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डोक्याला जबर मार लागल्यामुळे अतिरक्तस्त्राव होऊन उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देविदास नाईक हे रस्ता ओलांडत असताना प्रवासी बसने (जीए-05-टी-3708) त्यांना ठोकरले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी निष्काळजीपणे वाहन हाकल्याबद्दल बसचालक दीपक वासुदेव नाईक, बाजारवाडा-शिरोडा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संध्याकाळी उशिरांपर्यंत त्याला अटक करण्यात आली नव्हती. हवालदार दिलीप सिनारी तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)