शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अलर्ट! राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची एक लिंक अन् तुमचं बँक खातं धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 15:46 IST

सायबर शाखेने असे अनेक बनावट लिंक शोधून काढले आहेत. यामध्ये सायबर गुन्हेगार व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून लोकांची फसवणूक करत आहेत.

येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. त्यासाठी देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. देशातील सर्वसामान्यांमध्येही उत्सवानिमित्त वेगळाच उत्साह आहे. परंतु सायबर गुन्हेगार तुमच्या उत्साहाचा बेरंग करू शकतात. श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या  निमित्ताने अनेक सायबर ठग सक्रिय झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाकडून खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

सायबर गुन्हेगार तुम्हाला राम मंदिर प्राण प्रतिष्ठाच्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या नावाने मेसेज पाठवू शकतात. या मेसेजमध्ये एक लिंक देखील असू शकते, ज्यावर दावा केला जाईल की त्यावर क्लिक करून तुम्ही राम लल्ला सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाच्या सायबर शाखेने अलर्ट जारी केला आहे. सायबर शाखेने असे अनेक बनावट लिंक शोधून काढले आहेत. यामध्ये सायबर गुन्हेगार व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून लोकांची फसवणूक करत आहेत.

रामभक्तांनी सायबर गुन्हेगारांच्या या संदेशाच्या लिंकवर क्लिक करताच यानंतर, ही लिंक त्यांच्या मोबाईलमधील अतिसंवेदनशील डेटा चोरी करेल अथवा बँक खाते अ‍ॅप किंवा वॉलेट अ‍ॅप हॅक करून बँक खात्यातील रक्कम लंपास करू शकते. जर तुम्हाला असा मेसेज आला तर तुम्ही सतर्कता बाळगण्याची गरज आहे. यूजर्स कोणत्याही लिंकवर क्लिक न करता ती डीलिट करू शकतात. जर एखादा तुमच्या ओळखीतला व्यक्ती असा संदेश पाठवत असेल तर आपण त्याला या मेसेजची सत्यता सांगू शकता. अशा लिंक्स कोणाला आढळल्यास किंवा कोणतीही फसवणूक झाल्यास त्यांनी सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर कॉल करून आपली तक्रार नोंदवावी.

उत्तर प्रदेश सरकारनंही दिला अलर्ट

राम मंदिर सोहळ्याचे आणि प्राणप्रतिष्ठा विधीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. याच प्रक्षेपणावर सायबर हल्ल्याचा धोका आहे. त्यासंदर्भात उत्तर प्रदेश सरकारकडून इशाराही देण्यात आला आहे. या संदर्भात उत्तर प्रदेश सरकारच्या मुख्य सचिवांनी सर्व विभाग प्रमुखांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. सरकारी वेबसाइट्स आणि पोर्टल्सच्या सायबर सुरक्षेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्य सचिवांनी अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिवांना सायबर सुरक्षा कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर