ोन करा सायबर-प्रुफ
By admin | Updated: February 17, 2016 00:24 IST
तुमचा स्मार्ट फोन केवळ संपर्क साधण्यापुरता मर्यादित राहीलेला नाही. तर त्यात बॅंकेच्या व्यवहाराचा तपशील एटीएमचा नंबर, खासगी मेल, मॅसेज व छायाचित्र असतात. याव्यतिरीक्त इतरही अनेक महत्त्वाची माहिती तुमच्या स्मार्टफोनशी संलग्नीत असते. मात्र मोकाट सुटलेले सायबर गुन्हेगार एका क्लिकवर ही सर्व माहिती चोरू शकतात. तेव्हा सायबर क्राइमपासून स्वत:च्या फोनला सुरक्षित ठेवण्यासाठी नेमके काय करायला हवे, ते जाणून घेऊया...
ोन करा सायबर-प्रुफ
तुमचा स्मार्ट फोन केवळ संपर्क साधण्यापुरता मर्यादित राहीलेला नाही. तर त्यात बॅंकेच्या व्यवहाराचा तपशील एटीएमचा नंबर, खासगी मेल, मॅसेज व छायाचित्र असतात. याव्यतिरीक्त इतरही अनेक महत्त्वाची माहिती तुमच्या स्मार्टफोनशी संलग्नीत असते. मात्र मोकाट सुटलेले सायबर गुन्हेगार एका क्लिकवर ही सर्व माहिती चोरू शकतात. तेव्हा सायबर क्राइमपासून स्वत:च्या फोनला सुरक्षित ठेवण्यासाठी नेमके काय करायला हवे, ते जाणून घेऊया...फोन कायम पासवर्ड लॉक करून ठेवणे गरजेचे आहे. असे करण्यास जर तुम्ही आळस केलात तर मात्र तुमच्या फोनला शंभर टक्के धोका निर्माण होऊ शकतो.फोन कायम कंपनीच्या अधिकृत साइटवरूनच खरेदी करावा. कारण अशा ठिकाणांहून घेतलेल्या फोनमध्ये सायबर क्राइमला प्रतिबंध घालणारे ॲप्स अंतर्भूत असतात. ऑनलाईन खरेदीमध्ये धोका संभवतो. फोनमध्ये असंख्य मोफत ॲप्स भूरळ घालत असतात. मात्र कुठलेही ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी नीट तपासून घ्यावे. अन्यथा एखादया बनावट ॲप्स तुमचा पासवर्ड मिळवण्यात यशस्वी झाला तर सर्व खासगी माहिती उघड होऊ शकते.