शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

२ वर्षांत २०४% झाले सायबर गुन्हे; कर्नाटक, महाराष्ट्र व उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 6:02 AM

गृह मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरोकडील आकडेवारीनुसार सर्वाधिक १२०२० सायबर गुन्हे कर्नाटकमध्ये नोंदविले गेले. २०१७ मध्ये राज्यात ३१७४ गुन्हे नोंद झाले होते. लोकसंख्येचा विचार करता दर एक लाखामागे १८ पेक्षा जास्त गुन्हे आहेत.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : देशात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यानंतर दोन वर्षांत सायबर फसवणुकीचे गुन्हे दुप्पट झाले. सर्वाधिक सायबर गुन्हे कर्नाटकमध्ये नोंद झाले व त्यानंतर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे स्थान आहे.गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी नुकतेच संसदेत सांगितले की, २०१९ मध्ये देशात ४४५४६ सायबर गुन्हे नोंद झाले, तर २०१७ मध्ये ही संख्या २१७९६ होती.गृह मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरोकडील आकडेवारीनुसार सर्वाधिक १२०२० सायबर गुन्हे कर्नाटकमध्ये नोंदविले गेले. २०१७ मध्ये राज्यात ३१७४ गुन्हे नोंद झाले होते. लोकसंख्येचा विचार करता दर एक लाखामागे १८ पेक्षा जास्त गुन्हे आहेत. २०१९ मध्ये महाराष्ट्रात प्रति एक लाख लोकसंख्येमागे सायबर गुन्हे चारपेक्षा जास्त नोंद झाले. येथे सायबर गुन्ह्यांची संख्या ३६०४ वरून ४,९६७ झाली. कर्नाटकनंतर सर्वांत जास्त ११,४१६ गुन्हे उत्तर प्रदेशमध्ये नोंद झाले.सायबर गुन्ह्यांचा तपास करणे आणि न्यायालयीन कार्यवाही करणे, पोलीस प्रशिक्षण, सुरक्षा व्यवस्था बळकट करणे आणि एजन्सीजची क्षमता वाढविण्याची जबाबदारी राज्य सरकारांची आहे, असे मिश्रा म्हणाले. केंद्र सरकार वेगवेगळ्या योजनांतून राज्य सरकारांना अर्थसाह्य देत असल्याचे ते म्हणाले.गुन्हे रोखण्यासाठी स्थापन केले समन्वय केंद्रसायबर गुन्हे रोखण्यासाठी केंद्र सरकारने भारतीय सायबर अपराध समन्वय केंद्र स्थापन केले आहे. याशिवाय सायबर अपराध रिपोर्टिंग पोर्टल आणि आर्थिक फसवणूक, रक्कम चोरी रोखण्यासाठी नागरिक वित्तीय सायबर फसवणूक रिपोर्टिंग प्रणालीही सुरू केली गेली आहे. सायबर तक्रारी ऑनलाइन नोंद करण्यासाठी एक टोलफ्री नंबर  १५५२६० ही सुरू केला गेला आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम