शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

वेश्यागृहातील ग्राहकही कायद्यानुसार आरोपी, केरळ उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 07:34 IST

हायकोर्टाने निरीक्षण नोंदवले की, अनैतिक वाहतूक  कायद्याचे कलम ५ मध्ये वेश्या व्यवसायासाठी एखाद्या व्यक्तीची “खरेदी करणे” हा अपराध आहे. तथापि, हा कायदा “खरेदी करणे” या शब्दाची व्याख्या करत नाही. 

डॉ. खुशालचंद बाहेती -

तिरुवनंतपुरम : वेश्यागृहातील ग्राहकाला अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायदा, १९५६ अंतर्गत खटल्यात आरोपी  केले जाऊ शकते, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

एक ग्राहक  वेश्यालयात सापडला. त्याला पोलिसांनी कलम ३ (वेश्यालय चालवणे), ४ (वेश्या व्यवसायाच्या कमाईवर जगणे), ५ (वेश्येची खरेदी), ७ (सार्वजनिक ठिकाणी वेश्या व्यवसाय) अंतर्गत आरोपी केले. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर त्याने जिल्हा कोर्टात दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला. परंतु, तो फेटाळण्यात आला. जिल्हा कोर्टाच्या निर्णयास त्याने हायकोर्टात आव्हान दिले. त्याचा युक्तिवाद होता की, त्याने अनैतिक वाहतूक  कायद्याची ३, ४ व ७ मध्ये नमूद वेश्या व्यवसायाचा गुन्हा केलेला  नाही. तो त्या ठिकाणचा ग्राहक होता. त्यामुळे तो कलम ५ चा  अपराधी ठरत नाही

खरेदी हा अपराधहायकोर्टाने निरीक्षण नोंदवले की, अनैतिक वाहतूक  कायद्याचे कलम ५ मध्ये वेश्या व्यवसायासाठी एखाद्या व्यक्तीची “खरेदी करणे” हा अपराध आहे. तथापि, हा कायदा “खरेदी करणे” या शब्दाची व्याख्या करत नाही. 

त्यामुळे “खरेदी करणे” हा शब्द ज्या संदर्भात वापरला आहे ते समजून घेणे आवश्यक आहे. हायकोर्टाने त्याला कलम ३, ४ व ७ मधून मुक्त केले. पण, त्याच्या विरुद्धचा कलम ५ चा खटला रद्द करण्याची विनंती फेटाळली

अनैतिक वाहतूक कायद्याचा उद्देश महिलांचे  व्यापारीकरण आणि तस्करी रोखणे हा आहे. खरेदी करणे याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा ताबा मिळवणे आहे. त्यामुळे जो कोणी एखाद्या व्यक्तीला वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने मिळवतो तो  अनैतिक वाहतूक कायद्याच्या कलम ५ च्या कक्षेत येतो.  - न्या. पी. जी. अजितकुमार   

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयKeralaकेरळCourtन्यायालयProstitutionवेश्याव्यवसाय