शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम डिलिव्हरी बॉयच्या हातातून जेवण स्वीकारण्यास नकार; स्विगीनं व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 17:58 IST

डिलिव्हरी बॉयला धर्मासंदर्भात विचारून एका ग्राहकानं डिलिव्हरी ऑर्डर घेण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हैदराबादः हैदराबादेतल्या एका डिलिव्हरी बॉयला धर्मासंदर्भात विचारून एका ग्राहकानं डिलिव्हरी ऑर्डर घेण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर स्विगीनं नाराजी व्यक्त केली आहे. हैदराबादेत स्विगीचा डिलिव्हरी बॉय मुस्लिम असल्यानं ग्राहकानं त्याच्याकडून जेवण स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे त्या ग्राहकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक पी. श्रीनिवास म्हणाले, स्विगीचा कर्मचारी मुदस्सीर सुलेमान यानं बुधवारी एक तक्रार दाखल केली.एका ग्राहकानं जेवणाची ऑर्डर केली होती, मी डिलिव्हरी देण्यास गेलो असता त्यानं जात विचारली, तेव्हा मी मुस्लिम असल्याचं समजल्यावर त्यांनी जेवण स्वीकारण्यास नकार दिला, असं त्या मुस्लिम  डिलिव्हरी बॉयनं हे प्रकरण मुस्लिम संघटना मजलिस बचाओ तहरिकचे अध्यक्ष अमजद उल्ला खान यांच्याकडे नेलं आहे. त्यांनी ट्विटवरून या प्रकाराला वाचा फोडली. ते लिहितात, चिकन 65ची ऑर्डर दिली होती. हिंदू डिलिव्हरी बॉय पाठवतो. परंतु स्विगीनं डिलिव्हरीचं पार्सल मुस्लिम मुलाच्या हातातून पाठवलं. त्यानंतर ग्राहकानं ऑर्डर घेण्यास नकार दिला.   त्यानंतर स्विगीनंही या प्रकरणाचा निषेध नोंदवला. आम्ही प्रत्येक धर्म आणि विचारांचा आदर करतो. कोणाचीही ऑर्डर कोणा व्यक्तीच्या जातीधर्मावर आधारित नसते. एक संघटना म्हणून आम्ही कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये कोणताही भेदभाव करत नाही. प्रत्येक ऑर्डर स्वतंत्ररीत्या डिलिव्हरी केली जाते. ते ऑर्डरच्या लोकशनवर अवलंबून असतं.ज्या व्यक्तीनं ऑर्डर दिली होती, त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. ग्राहकानं ज्या रेस्टॉरंटमधून ऑर्डर केली होती, ते मुस्लिम व्यक्ती चालवत होता. तत्पूर्वी मध्य प्रदेशमध्येही असाच एक प्रकार समोर आला होता. परंतु त्यावेळी जेवण पोहोचवणारी कंपनी झोमॅटो होती. त्यावेळी झोमॅटोनंही जाती-धर्मात भेदभाव करत नसल्याची भूमिका मांडली होती.