श्रीनगर : शुक्रवारच्या नमाजपूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगरसह काश्मीरच्या अनेक भागांत आज पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली. संचारबंदी आणि फुटीरवाद्यांच्या बंदमुळे खोऱ्यातील जनजीवन सलग ५६ व्या दिवशीही सुरळीत होऊ शकले नाही. संपूर्ण श्रीनगर जिल्हा आणि खोऱ्यातील इतर काही शहरांत खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. संचारबंदी लागू करण्यात आलेल्या शहरांत अनंतनाग, पुलवामा, कुलगाम, शोपियां, बारामुल्ला आणि पट्टन यांचा समावेश आहे.
काश्मिरात पुन्हा अनेक ठिकाणी संचारबंदी
By admin | Updated: September 3, 2016 06:16 IST