शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

रोहितच्या आत्महत्येवरून रणकंदन सुरूच

By admin | Updated: January 21, 2016 03:24 IST

हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला यांच्या आत्महत्येवरून राजकारण तापले असताना बुधवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय तसेच

नवी दिल्ली/हैदराबाद : हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला यांच्या आत्महत्येवरून राजकारण तापले असताना बुधवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय तसेच विद्यापीठाचे कुलगुरु अप्पाराव पोडिले असे सर्वजण मैदानात उतरले. हा ‘दलित विरूद्ध सवर्ण’ वाद नाही. त्यामुळे निरर्थक विधाने करून समुदाय आणि विद्यार्थ्यांना भडकवणे थांबवा, अशा खरमरीत शब्दांत स्मृती इराणी यांनी विरोधकांचा समाचार घेतला. दत्तात्रेय यांनी स्वत:वरील सर्व आरोप धुडकावून लावले. तर कुलगुरु पोडिले यांनीही या मुद्याचे राजकारण दुर्दैवी असल्याचे सांगत रोहितसह पाच विद्यार्थ्यांच्या निलंबनामागे कुठलाही दबाव नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान उच्च न्यायालयाने याप्रकरणी हस्तक्षेपास नकार दिला.इराणी यांनी पत्रपरिषदेत रोहितच्या आत्महत्येच्या मुद्यावर सरकार व आपल्या मंत्रालयाची भूमिका स्पष्ट केली. रोहितने आत्महत्येपूर्वी लिहिलेले पत्र त्यांनी पत्रपरिषदेत वाचून दाखवले. त्यात कोणाचाही नामोल्लेख नाही अथवा कोणावरही दोषारोप नाही. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याबद्दल रोहितने त्याच्या कुटुंबाची माफी मागितली आहे. अशास्थितीत या मुद्यावर कुठलेही राजकारण व्हायला नको. मुळातच हा ‘दलित विरूद्ध सवर्ण’ असा वाद नाही, असे इराणी म्हणाल्या. हैदराबाद विद्यापीठात दोन विद्यार्थी गटांमध्ये भांडण झाले. हे दोन्ही गट मागास वर्गाचे प्रतिनिधित्व करीत होते. ज्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली. त्यांच्या कुटुंबीयांनी एफआयआर दाखल केला आहे. पोलीस तपास करीत आहेत. या संपूर्ण प्रकरणात चुकीचे तथ्य समोर केले जात आहे. ज्यांना प्रकरणाची पूर्ण माहिती नाही, असे काहीजण नाहक विधाने करण्यात गुंतले आहेत. दुर्दैव म्हणजे या निरर्थक विधानांवर मला स्पष्टीकरण द्यावे लागतेय. यापूर्वी कुठल्याही मनुष्यबळ विकास मंत्र्याने असे स्पष्टीकरण दिले नसेल, असेही त्या म्हणाल्या.‘मी केवळ निवेदन पुढे रेटले’हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थ्यांच्या निलंबन कारवाईसाठी मी जाणीवपूर्वक कुठलेही प्रयत्न केले नाहीत. केंद्रीयमंत्री असतानाच मी सिकंदराबाद मतदारसंघाचा खासदारही आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने सर्व समुदायाचे लोक माझ्याकडे त्यांच्या तक्रारी, समस्या व निवेदन घेऊन येतात. काही विद्यार्थ्यांकडून स्वीकारलेले निवेदन मी संबंधित मंत्रालयाकडे पाठवले. लोकप्रतिनिधी या नात्याने असे करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. या संपूर्ण प्रकरणात माझी भूमिका इथपर्यंतच मर्यादीत होती, असे केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी बुधवारी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)केंद्रीय मंत्री निलंबनासाठी दबाव टाकल्याचा आरोप फेटाळला४रोहितसह पाच दलित विद्यार्थ्यांच्या निलंबनासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हैदराबाद विद्यापीठावर दबाव टाकल्याचा आरोपही इराणी यांनी धुडकावून लावला. संशोधन करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना निलंबित करावे, अशी शिफारस केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी मनुष्यबळविकास मंत्रालयास केली होती. ४दत्तात्रेय यांच्या शिफारसीनंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याप्रकरणी हैदराबाद विद्यापीठास या कारवाईसंदर्भात पाच स्मरणपत्रे लिहिल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने ही स्मरणपत्रे केवळ प्रक्रियेचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. सेंट्रल सेक्रेट्रिएटच्या नियमांनुसार हे स्मरणपत्रे लिहिली गेली. ४कुठल्याही खासदाराने मला पत्र लिहिल्यास त्यांना १५ दिवसांच्या आत उत्तर देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना आहेत. ही प्रक्रिया आम्ही नाही तर काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारने निश्चित केली आहे.हैदाराबाद विद्यापीठाचा मुद्दा उपस्थित करणारे बंडारू दत्तात्रेय हे एकटे नेते नाहीत. काँग्रेस नेते हनुमंत राव यांनीही १७ नोव्हेंबर २०१४ रोजी या मुद्यावर मंत्रालयास एक पत्र लिहिले होते. राव यांच्या पत्रावर विद्यापीठाकडून स्पष्टीकरण मिळवण्यासाठी आम्ही सहा स्मरणपत्रे पाठवली होती. हनुमंत राव यांनीही आपल्या पत्रात तेलंगणच्या विद्यार्थ्यांचा होणारा छळ आणि गत चार वर्षांत विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.रोहितला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेले हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरु अप्पा राव पोडिले यांनीही बुधवारी आपले मौन सोडले. रोहितसह चार विद्यार्थ्यांवर कुठल्याही दबावातून निलंबन कारवाई केली गेली नाही. दुर्दैवाने या मुद्यावर राजकारण केले जात आहे, असे ते म्हणाले. मी भाजपाचा माणूस नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता रोहितच्या आत्महत्येनंतर विद्यापीठाला भेट देत आहे. एका शैक्षणिक संस्थेत सुरू असलेले हे राजकारण माझ्या आकलनापलिकडचे आहे. यामुळे मी दु:खी आणि अस्वस्थ आहे, असे ते म्हणाले.