शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

CRPF जवानाने आपल्याच सहका-यांवर केला अंदाधुंद गोळीबार, चार जवानांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 09:55 IST

छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील माओवाद प्रभावित क्षेत्रात तैनात असलेल्या सीआरपीएफच्या एका जवानाने आपल्याच सह-यांवर अंदाधुंद गोळीबार केला.

ठळक मुद्देहका-यांबरोबर झालेल्या शाब्दीक बाचाबाचीतून संतापलेल्या जवानाने हे कृत्य केले. सहका-यांबरोबर वाद झाल्यानंतर सानत कुमारने त्याच्या जवळच्या एक-47 रायफलमधून अंदाधुंद गोळीबार केला.

बस्तर - छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील माओवाद प्रभावित क्षेत्रात तैनात असलेल्या सीआरपीएफच्या एका जवानाने आपल्याच सह-यांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाला असून एक जवान जखमी झाला आहे. सीआरपीएफच्या 168 बटालियनमधले हे जवान होते. बिजापूरमधील बासागुडा येथे शनिवारी संध्याकाळी 5.15 च्या सुमारास ही घटना घडली. 

बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी ही माहिती दिली. सहका-यांबरोबर झालेल्या शाब्दीक बाचाबाचीतून संतापलेल्या जवानाने हे कृत्य केले. मृत जवानांची ओळख पटली असून व्ही.के.शर्मा, मेघ सिंह राजवीर सिंह आणि जी.के.राव अशी मृत जवानांची नाव आहेत. कॉन्स्टेबल गजानंद नावाचा जवान जखमी झाला आहे. त्याल जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.  

 

सानत कुमार असे आरोपी जवानाचे नाव आहे. सहका-यांबरोबर वाद झाल्यानंतर सानत कुमारने त्याच्या जवळच्या एक-47 रायफलमधून अंदाधुंद गोळीबार केला. आरोपी सानत कुमारला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. कुठल्या परिस्थिती सानत कुमारने हे पाऊल उचलेल, इतके टोकाचे पाऊल उचलण्यासाठी काय कारण घडले त्याची अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश सीआरपीएफने दिले आहेत.