शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
4
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
5
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
6
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
7
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
8
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
9
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
10
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
11
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
12
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
13
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
14
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
15
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
16
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
17
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
18
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
19
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
20
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री

संकटमोचक ११२!

By admin | Updated: June 30, 2015 01:44 IST

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील भीषण निर्भया हत्याकांडानंतर तब्बल अडीच वर्षांनी सरकारने अखेर देशव्यापी आपत्कालीन फोन सेवेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे.

नितीन अग्रवाल , नवी दिल्लीसंपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील भीषण निर्भया हत्याकांडानंतर तब्बल अडीच वर्षांनी सरकारने अखेर देशव्यापी आपत्कालीन फोन सेवेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. अमेरिकेतील ९११ क्रमांकाच्या धर्तीवर आता भारतातही ११२ हा तीन अंकी क्रमांक महिलांसाठी संकटमोचकाचे काम करणार आहे.येत्या दीड वर्षात ही सेवा सुरू करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. ही सेवा प्रामुख्याने संकट काळात महिलांना अत्यंत मदतीची ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नॅशनल इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टिम (एनईआरएस) नामक ही तीन अंकी आपत्कालीन सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागितले आहेत. १,००० कोटी रुपयांवर टर्नओव्हर असलेल्या आयटी कंपन्यांनाही ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुढील पाच वर्षे एनईआरएस स्थापित करून ती चालविण्यासंदर्भात प्रस्ताव देता येईलनिर्भयाच्या नावावर सुरू करण्यात येणाऱ्या या क्रमांकावर पहिल्या वर्षी सुमारे १८ कोटी कॉल्स (दर दिवसाला ५ लाख) येतील आणि पुढील पाच वर्षांत ही संख्या दुप्पट म्हणजे ३६ कोटींवर जाऊ शकते, असा गृहमंत्रालयाचा अंदाज आहे.अशी असेल व्यवस्था- गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे देशभरातील असंख्य केंद्रांचा समावेश असलेले एक नेटवर्क असेल. अडचणीच्या वेळी लँडलाईन, मोबाईल, एसएमएस, चॅट, ई-मेल, व्हीओआयपी, सार्वजनिक परिवहनमधील पॅनिक बटण, मोबाईल अ‍ॅप्लिकेशन अथवा इंटरनेट आदी कुठल्याही माध्यमाने यावर मदत मागता येईल. ४अत्याधुनिक कॉल सेंटर कॉलरचे लोकेशन शोधून सर्वांत जवळच्या पोलीस चौकीला त्वरित मदत करण्याचे निर्देशही देतील. अडचणीतील लोकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी जीपीएस आणि सर्व प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.४१६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीतील निर्भया बलात्कार व हत्याकांडानंतर ही योजना आखण्यात आली होती. निर्भया पोर्टल४तीन अंकी क्रमांकासोबतच निर्भया पोर्टलही तयार करण्यात येईल. थेट कॉल करण्यास इच्छुक नसलेल्या महिला या पोर्टलच्या माध्यमाने मदत मागतील.