श्रीकांत खटोड यांच्याविरुद्ध न्यायालयात फौजदारी खटला चौकशी अहवाल मागविला : मोहाडी शिवारातील शेतजमीन हडपल्याची तक्रार
By admin | Updated: July 5, 2016 23:31 IST
जळगाव : महागणपती गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन श्रीकांत गोपालदास खटोड (रा.जयनगर, जळगाव) यांच्याविरुद्ध रामरतन मांगो भिल (रा.मोहाडी, ता.जळगाव) यांनी शेतजमीन हडप केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल पोलिसांनी सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
श्रीकांत खटोड यांच्याविरुद्ध न्यायालयात फौजदारी खटला चौकशी अहवाल मागविला : मोहाडी शिवारातील शेतजमीन हडपल्याची तक्रार
जळगाव : महागणपती गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन श्रीकांत गोपालदास खटोड (रा.जयनगर, जळगाव) यांच्याविरुद्ध रामरतन मांगो भिल (रा.मोहाडी, ता.जळगाव) यांनी शेतजमीन हडप केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल पोलिसांनी सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.मोहाडी शिवारातील गट क्रमांक १०८ मधील शेतजमीन ही सरकारकडून आदिवासी इनामवर्ग म्हणून भिल कुटुंबीयांना कसण्यासाठी दिली होती. श्रीकांत खटोड यांनी रामरतन भिल व त्यांच्या कुटुंबीयांच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन या शेतजमिनीचे बेकायदेशीर खरेदीखत नोंदवून घेतले. तसेच जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधकांना खोटी माहिती देऊन बनावट दस्तावेज तयार केले. या माध्यमातून खटोड यांनी ही शेतजमीन नावावर करून घेतल्याची तक्रार करीत रामरतन भिल यांनी मुख्य न्यायदंडाधिकार्यांच्या न्यायालयात १४ जूनला खटोड यांच्याविरुद्ध फौजदारी खटला (क्रमांक ३७२/२०१६) दाखल केला. त्यात न्यायालयाने पोलिसांना फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम २०२ प्रमाणे चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश ३० जूनला दिले आहेत. या प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲड.हेमंत इंगळे कामकाज पाहत आहेत.कोट...........सदरची जमीन ही आदिवासी जमीन आहे. ती शासनाच्या परवानगीनेच घेतलेली आहे. या जमिनीच्या व्यवहाराचे पूर्ण पैसेदेखील संबंधितांना देण्यात आले आहेत. परंतु ब्लॅकमेल करणार्या लोकांच्या मदतीने संबंधितांकडून आणखी पैसे उकळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.-श्रीकांत खटोड.