शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

९ वर्षांच्या मुलावर 'कायदा व सुव्यवस्थेचे' उल्लंघन केल्याचा गुन्हा

By admin | Updated: August 8, 2014 14:24 IST

कायदा व सुव्यवस्थेचे' उल्लंघन केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिसरीत शिकणा-या अवघ्या ९ वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

ऑनलाइन टीम

आग्रा, दि. ८ -  राज्यात कायद्याचे व सुरक्षित वातावरण राखण्यास अपयशी ठरत असल्यामुळे टीकेचे धनी होत असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांनी आणखी एक कारनामा केला आहे. 'कायदा व सुव्यवस्थेचे' उल्लंघन केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिसरीत शिकणा-या अवघ्या ९ वर्षांच्या मुलावर गुन्हा दाखल केला.
फिरोजाबाद जिल्ह्यातील टुंडला पोलिसांनी ही कारवाई केली असून त्या मुलाच्या वडिलांनाही अटक करण्यात आली होती. अखेर नातेवाईकांनी न्यायालयात धाव घेतल्यावर त्या मुलाला गुरूवारी जामीनावर सोडण्यात आले. 
हे प्रकरण आहे १८ जुलैचे. कुर्रा गावातील या मुलाच्या कुटुंबियांनी पाळलेली गुरं-ढोरं दुस-या गावक-याच्या शेतात घुसली आणि त्यांनी पिकांचे नुकसान केले. या घटनेनंतर त्या मुलाची दुस-या मुलाशी बाचाबाची झाली ज्याचे रुपांतर नंतर मोठ्या भांडणात झाले. ५ ऑगस्ट रोजी पोलिस त्या मुलाच्या घरी गेले आणि त्यांनी वडिलांसह त्या मुलाला ताब्यात घेतले.  त्यांचे काहीही ऐकून न घेता तपोलिसांनी त्यांच्यावर कलम १०७/११६ अंतर्गत कायदा व सुव्यवस्थआ बिघडवण्याचा गुन्हा दाखल केला. 
मात्र पोलिसांनी हे वृत्त फेटाळले असून त्या मुलाला ताब्यात घेतल्याचे नाकारले, तसेच आपण फक्त त्या मुलाच्या वडिलांची काही तास चौकशी केल्याचे पोलिसांनी सांगितले.