शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

एक तरुणी, दोन तरुण, दुचाकीवरून जाताना करत होते थिल्लर चाळे, करत होती असे इशारे, त्यानंतर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 21:15 IST

Madhya Pradesh Crime News: Crime News: दुचाकीवर उभं राहून स्टंटबाजी करणं आणि लोकांना फ्लाईंग किस देणं एक तरुणी आणि तिच्यासोबत असलेल्या दोन तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे.

दुचाकीवरून जाताना स्टंटबाजी करणं, थिल्लर चाळे करणं असले प्रकार अनेक तरुण तरुणींकडून करण्यात आल्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. दरम्यान, भोपाळमधील व्हीआयपी रोडवर दुचाकीवर उभं राहून स्टंटबाजी करणं आणि लोकांना फ्लाईंग किस देणं एक तरुणी आणि तिच्यासोबत असलेल्या दोन तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. हे चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दुचाकीवरील दोन तरुणांना अटक केली आहे. तर त्यांच्यासोबत असलेली तरुणी फरार झाली आहे.

या प्रकाराबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २८ फेब्रुवारी रोजी घडली होती. व्हीआयपी रोडवर दोन तरुण सुसाट वेगाने दुचाकी चालवत असून, त्यांच्यासोबत बसलेली तरुणी लोकांकडे पाहून अश्लील इशारे करत आहे, अशी तक्रार एका व्यक्तीने कोहेफिजा पोलीस ठाण्यामध्ये येऊन दिली होती.  या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी दुचाकीचालक आणि त्यांच्यासोबत असलेल्यांविरोधात कलम २८१, १२५, २९६ ३(५) आणि १८४ वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर कोहेफिजा पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त पथकाने भरधाव वेगात दुचाकी चालवून स्टंटबाजी करत असलेला दुचाकी चालक रितिक यदुवंशी आणि त्याच्या मागे बसलेला सुमित कुमार यांना अटक केली. मात्र त्यांच्याकडील दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तसेच त्यांचा परवाना रद्द करण्यासाठी परिवहन विभागाला पत्र पाठवण्यात आलं आहे. मात्र या तरुणांसोबत असलेली तरुणी फरार झाली असून, तिचा शोध घेतला जात आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTrafficवाहतूक कोंडीMadhya Pradeshमध्य प्रदेश