शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

माजी हवाईदल प्रमुखांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: July 5, 2014 05:19 IST

हेलिकॉप्टर्सच्या ३६०० कोटींच्या सौद्यात लाचखोरीचा आरोप असलेले माजी वायुदलप्रमुख एस.पी. त्यागी आणि इतरांविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)मनी लाँड्रिंगचा शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे

नवी दिल्ली : अगुस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्सच्या ३६०० कोटींच्या सौद्यात लाचखोरीचा आरोप असलेले माजी वायुदलप्रमुख एस.पी. त्यागी आणि इतरांविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)मनी लाँड्रिंगचा (काळा पैसा पांढरा करणे) शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. या सौद्यात कुणाकुणाला लाच देण्यात आली यासंबंधी तपासाला वेग दिला जाणार आहे.या सौद्यात ३६० कोटी रुपयांपेक्षा जास्त लाच देण्यात आल्याचा आरोप असून सीबीआयने मार्च २०१३ मध्ये एफआयआर दाखल करीत लाचखोरीचा छडा लावला होता. ईडीने याप्रकरणी विदेशी विनिमय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने एक वर्षाआधी दाखल केलेल्या तक्रारींची दखल घेत मनी लाँड्रिंग कायद्यातील विविध तरतुदींनुसार त्यागी, त्यांच्या कुटुंबातील सदस्य, युरोपीयन नागरिक कार्लो जेरासा, क्रिश्चियन मायकेल, गुड्डो हशके तसेच इटलीची फिनमेक्केनिका, ब्रिटनची अगुस्टा वेस्टलँड, चंदीगडची आयडीएस इन्फोटेक तसेच एअरोमॅट्रिक्स या चार कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ईडीने एकूण १३ जणांचा एफआयआरमध्ये समावेश केला आहे. इटली आणि काही युरोपीयन देशांना विनंतीपत्रे पाठविण्यात आली असून लवकरच आरोपींचा जाबजबाब नोंदविण्याचे काम सुरू केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.मालमत्तेवर टाच आणणारमनी लाँड्रिग कायद्यानुसार आरोपींच्या चल- अचल मालमत्तेवर टांच आणली जाणार आहे. लाचेचा पैसा हुडकून काढण्यासाठी गुन्हेगारी खटला दाखल करणे आवश्यक असून त्यासाठी विविध देशांसोबत असलेले सध्याचे करार आणि करासंबंधी आदान- प्रदान शिष्टचारानुसार सहकार्य घेतले जाणार आहे. हा सौदा प्रत्यक्षात आणण्यासाठी अगुस्टा वेस्टलँडने लाच दिल्याचा आरोप इटालियन अधिकाऱ्यांनी केल्यानंतर या कंपनीच्या १२ हेलिकॉप्टरचा खरेदीचा सौदा सीबीआयच्या रडारखाली आला. घोटाळा प्रकाशात आल्यानंतर संपुआ सरकारने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये हा सौदा रद्द केला. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने या कंपनीने बँकेत जमा केलेली २४०० कोटी रुपयांची हमीरक्कम काढून घेतली आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)