शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

आता टोमॅटोंपासून मालामाल होतोय धोनी, माहीच्या शेतातील टोमॅटो 40 रु. किलो, असा आहे गाईच्या दुधाचा भाव

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 24, 2020 20:41 IST

ईजा फॉर्म नावाच्या ब्रँडने येथील उत्पादनांची विक्री होत आहे. सोमवारपासून येथे टोमॅटो आणि दुधाची विक्री सुरू झाली. तर पुढच्या 20 दिवसांत पत्ता कोबी, बीन्नस, फूलकोभीदेखीलल बाजारात येणार आहे.

रांची - क्रिकेटच्या मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडणारा महेंद्र सिंह धोनी आता शेतीतही हेलीकॉप्टर शॉट मारताना दिसत आहे. तीन वर्षांपूर्वी धोनीने धुर्वा येथील सेंबो फॉर्म हाऊसमध्ये शेती आणि डेअरी व्यवसायाला सुरुवात केली होती. आता तेथे मोठ्या प्रमाणावर भाज्या आणि दुधाचे उत्पादन होत आहे. ईजा फॉर्म नावाच्या ब्रँडने येथील उत्पादनांची विक्री होत आहे. सोमवारपासून येथे टोमॅटो आणि दुधाची विक्री सुरू झाली. मात्र, सध्या धोनी कुटुंबीयांसह दुबईत आहे.

त्याच्या धुर्वा सेंबो येथील फार्म हाऊसमधील ऑर्गनिक भाज्या बाजारात मिळू लागल्या आहेत. सध्या बाजारात केवळ टोमॅटो आणि दूध मिळत आहे. माहीच्या शेतातील टोमॅटोंना बाजारात 40 रु. किलो भाव असून. 80 किलो टोमॅटोंपैकी 71 किलो टोमॅटो विकले गेले आहेत. तर पुढच्या 20 दिवसांत पत्ता कोबी, बीन्नस, फूलकोभीदेखीलल बाजारात येणार आहे. एवढेच नाही, तर येथे स्ट्रॉबेरी आणि ब्रोकलीचीही शेती केली जात आहे.

धोनीच्या फार्ममधील भाज्यांची मार्केटिंग शिवनंदन करत आहेत. ते म्हणाले, धोनीने काही दिवसांपूर्वी भेटण्यासाठी बोलावले होते. तेव्हा तो म्हणाला, त्याच्या शेतात भाज्या आणि दुधाचे उत्पादन घेतले जात आहे. याचे मार्केटिंग करायचे आहे. यानंतर अॅग्रिमेंट झाले आणि भाज्या विकायला सुरुवात झाली.

कडकनाथ कोंबड्यांचे उत्पादन, लवकरच मिळणार -शिवनंदन यांनी सांगितले, येथील दूध 55 रु. लिटर विकले जात आहे. यात कसल्याही प्रकारची भेसळ नाही. पंजाबवरून एकूण 60 गाई आणण्यात आल्या होत्या. जर्सी आणि शहवाल जातीच्या गाईंच्या दूधाची विक्री बाजारात केली जात आहे. सध्या अपर बाजार, लालपूर, वर्धमान कंपाउंड येथे विक्री केली जात आहे. याशिवाय पीपी कंपाउंडमध्येदेखील लवकरच काउंटर सुरू करण्यात येतील. विशेष म्हणजे धोनीने आपल्या फॉर्म हाऊससाठी कडकनाथ कोंबड्यांची पिल्लंदेखील मागवली आहेत. धोनीच्या फार्म हाऊसमध्ये जवळपास 2 हजार कोंबडे आहेत.

 

टॅग्स :MS Dhoniमहेंद्रसिंग धोनीFarmerशेतकरीmilkदूध