शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती दोन वर्षांनी जिवंत घरी! मध्य प्रदेशातील अजब घटना; नातेवाइकांना आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 06:14 IST

Jara Hatke News: : कोरोनाने मरण पावल्याने मृतदेहावर नातेवाइकांनी अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती प्रत्यक्षात जिवंत असल्याचे आढळले आहे. अंत्यसंस्काराच्या घटनेनंतर ही व्यक्ती दोन वर्षांनी घरी परत आली आहे.

धार : कोरोनाने मरण पावल्याने मृतदेहावर नातेवाइकांनी अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती प्रत्यक्षात जिवंत असल्याचे आढळले आहे. अंत्यसंस्काराच्या घटनेनंतर ही व्यक्ती दोन वर्षांनी घरी परत आली आहे. कमलेश पाटीदार (वय ३५ ) असे त्याचे नाव आहे. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात घडलेला हा अजब प्रकार सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

मध्य प्रदेशातील करोदकला गावामध्ये शनिवारी सकाळी सहा वाजता कमलेशने आपल्या मावशीच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्याला जिवंत पाहून सर्वांनाच धक्का बसला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या आजाराचा  संसर्ग झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर रुग्णालयाने हवाली केलेल्या कमलेशच्या पार्थिवावर नातेवाइकांनी अंतिम संस्कारही केले होते. ही माहिती कमलेशचा चुलत भाऊ मुकेश पाटीदार याने पत्रकारांना दिली.

मृत घोषित केलेला कमलेश प्रत्यक्षात जिवंत आहे हे पाहून नातेवाईक आनंदित झाले. मात्र, गेल्या दोन वर्षांत तो कुठे राहत होता याबद्दल कमलेशने मौन बाळगले आहे. यासंदर्भात कानवन पोलिस ठाण्याचे प्रमुख अधिकारी रामसिंह राठोड यांनी सांगितले की, कमलेश पाटीदारला २०२१ मध्ये कोरोना झाल्याने वडोदरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती त्याच्या नातेवाइकांकडून पोलिसांना मिळाली. रुग्णालयाने कमलेशचा म्हणून दिलेल्या मृतदेहाची नातेवाइकांनीही ओळख पटविली होती. (वृत्तसंस्था)

दोन वर्षांबद्दल कमलेशने बाळगले मौन- मृत घोषित झालेल्या पण प्रत्यक्षात जिवंत असलेला कमलेश पाटीदार हा गेल्या दोन वर्षांपासून कुठे राहायला होता, या काळात तो काय करत होता याबद्दल पोलिस चौकशी करणार आहेत. घरी परत आलेल्या कमलेशची वैद्यकीय तपासणीही करण्यात येणार आहे. - कमलेशचा म्हणून जो मृतदेह त्याच्या नातेवाइकांच्या हवाली करण्यात आला तो नेमका कुणाचा होता, असाही सवाल आता विचारला जात आहे. याप्रकरणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठा गोंधळ घालून ठेवला असावा, असेही म्हटले जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेश