शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हाणामारीच्या घटनांचा आलेख उंचावला दोन दिवसात ६ घटना : तरुणाईचे समुपदेशन करण्याची गरज

By admin | Updated: April 5, 2016 00:15 IST

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून शहरात हाणामारीच्या घटनांचा आलेख उंचावला आहे. क्षुल्लक कारणांवरून तरुणांमध्ये हाणामारी होत असल्याच्या घटना एक किंवा दोन दिवसाआड समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसातच तब्बल ६ घटना घडल्या असून असे प्रकार चिंताजनक आहेत. किरकोळ स्वरुपाच्या कारणाने तरुणांच्या गटात होणार्‍या मारहाणीमुळे भविष्यात दंगलीसारखा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनासह सामाजिक संस्थांनी तरुणाईचे समुपदेशन केले पाहिजे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून शहरात हाणामारीच्या घटनांचा आलेख उंचावला आहे. क्षुल्लक कारणांवरून तरुणांमध्ये हाणामारी होत असल्याच्या घटना एक किंवा दोन दिवसाआड समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसातच तब्बल ६ घटना घडल्या असून असे प्रकार चिंताजनक आहेत. किरकोळ स्वरुपाच्या कारणाने तरुणांच्या गटात होणार्‍या मारहाणीमुळे भविष्यात दंगलीसारखा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनासह सामाजिक संस्थांनी तरुणाईचे समुपदेशन केले पाहिजे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
तरुणांमध्ये घडणार्‍या हाणामारीच्या घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यस्थेला गालबोट लागत आहे. असे असताना पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही स्वरुपाच्या उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे. हाणामारीचा प्रकार घडल्यानंतर संबंधिताची फिर्याद अथवा तक्रार दाखल करून घेण्यापलीकडे पोलिसांकडून फारसे प्रयत्न होत नाही. तरुणांमध्ये झालेल्या वादातून शांततेला गालबोट लागल्याच्या घटनादेखील मागील एक ते दीड महिन्यांच्या काळात घडल्या. शनिपेठेतील दंगल याचेच उदाहरण आहे. तरुणांमधील वादातून पोलीस ठाण्याच्या आवारातच रात्री दंगल उसळली. त्यानंतरही ठोस उपाययोजना पोलीस प्रशासनाने केलेल्या नाहीत.
दोन दिवसात सहा घटना
गेल्या दोन दिवसाच्या काळात शहरात विविध ठिकाणी तरुणांमधील हाणामारीच्या तब्बल सहा घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यात १ एप्रिलला रात्री पावणे दहा वाजता सौरभ शिंपी व धीरज चिरमाडे या तरुणांना मारहाण झाली. त्यानंतर १०.३० वाजता विलास वराडे या बस चालकास गुजराल पेट्रोल पंपाजवळ दोघांनी मारहाण केली. २ एप्रिलला दुपारी ४.३० वाजता राहुल पाटील या तरुणाचे दगडाने डोके फोडले. याच दिवशी समतानगरात रात्री ११ वाजेच्या सुमारास अक्षय मौर्य या तरुणाला मारहाण झाली. ३ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता टॉवर चौकात शाकीर शेख शकील उर्फ राजू या तरुणास ५ तरुणांनी बेदम मारहाण केली. तर रात्री १० वाजता जिल्हा रुग्णालयासमोर योगेश सपकाळे याला चार जणांनी मारहाण केली.
उपाययोजना हव्यात
शहरासह महामार्गावर रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे हॉटेल्स, बिअरबार व खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर तरुण मद्यप्राशन करतात. त्यानंतर अनेकदा हाणामारीच्या घटना घडतात. म्हणून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून हॉटेल्स लवकर बंद होतील, अशी उपाययोजना करायला हवी. रात्री चौका-चौकात तरुणांचे टोेळके थांबतात. त्यालाही प्रतिबंध घातला पाहिजे. धूम स्टाइल वाहनचालकांवरही नियंत्रण असायला हवे.