शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 11:20 IST

सीपी राधाकृष्णन देशाचे १५ वे उपराष्ट्रपती बनले असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना गोपनियतेची शपथ दिली.

CP Radhakrishnan Oath: देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी आपल्या पदाची शपथ घेतली. लाल कुर्ता घालून राधाकृष्णन यांनी इंग्रजीत शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पद सोडल्यानंतर जगदीप धनखड पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसले. त्यामुळे सर्वांच्याच नजरा  त्यांच्यावर होत्या.

देशाचे नवे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी त्यांच्या आधी उपराष्ट्रपती असलेले जगदीप धनखड देखील उपस्थित होते. २२ जुलै रोजी अचानक राजीनामा दिल्यानंतर त्यांचे पद रिक्त झाले आणि त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी निवडणुका झाल्या. राजीनाम्यानंतर जगदीप धनखड सार्वजनिक ठिकाणी दिसण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांच्याशिवाय माजी राष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि हमीद अन्सारी यांनीही शपथविधीला हजेरी लावली. राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठेही दिसले नसल्याने विरोधी पक्षाकडून सातत्याने ते कुठे आहेत आणि कसे आहेत याबद्दल प्रश्न विचारले जात होते.

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीने अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. धनखड हे शपथविधी समारंभात पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्या शेजारी व्यंकय्या नायडू आणि हमीद अन्सारी बसलेले दिसले. यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, हरियाणाचे नायब सिंह सैनी आणि उत्तराखंडचे पुष्कर सिंह धामी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि इतर केंद्रीय मंत्री देखील या समारंभात सहभागी झाले होते.

दरम्यान, शुभ मुहूर्त पाहून राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आल्याचे एनडीएच्या सदस्यांचे म्हणणं आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी, कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, झारखंडचे संतोष गंगवार, चंदीगडचे प्रशासक गुलाबचंद कटारिया हे देखील यावेळी उपस्थित होते. राधाकृष्णन यांना ९ सप्टेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत त्यांना एकूण ४५२ मते मिळाली. तर विरोधी उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना फक्त ३०० मते मिळाली.

टॅग्स :jagdeep dhankharजगदीप धनखडNarendra Modiनरेंद्र मोदीDraupadi Murmuद्रौपदी मुर्मू