शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

मध्य प्रदेशात केरळची पुनरावृत्ती; स्फोटकमिश्रित खाद्य दिल्यानं गाय गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 23:25 IST

पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद; आरोपीला त्वरित पकडण्याची संघटनेची मागणी; तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

उमरिया : मध्यप्रदेशातील उमरिया जिल्ह्यात अज्ञात आरोपींनी एका गायीला स्फोटकमिश्रित खाद्य खाऊ घातल्याने ही गाय गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. केरळात स्फोटक घातलेले अननस खाल्ल्याने एका हत्तिणीचा मृत्यू झाल्याची घटना अलीकडेच घडली होती. त्यावरून देशभरात गदारोळही उठला होता. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशातील घटनाही संवेदनशील समजली जात आहे.मध्यप्रदेशच्या उमरिया जिल्ह्यातील गिंजरी गावात ही घटना घडली. गायीचे मालक ओमप्रकाश अग्रवाल यांनी सांगितले की, आम्ही रोज सकाळी गाय चरायला सोडून द्यायचो. घराच्या आसपास ५00 मीटरच्या परिसरात ती चरून संध्याकाळी घरी येत असे. तथापि, १४ जून रोजी ती परत आली नाही. आम्ही दोन दिवस तिचा शोध घेतला. १६ जूनला ती आम्हाला जखमी अवस्थेत सापडली. तिचा खालचा जबडा फाटलेला आहे. गायीला स्फोटकमिश्रिम खाद्य खायला दिल्यामुळे तिचा जबडा फाटला असावा, असा मला संशय आहे. गाय आता काहीही खाईनाशी झाली आहे. तिला एक महिन्याचे वासरू असून] त्याला दूध मिळेनासे झाले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन शर्मा यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले की, पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाय जखमी झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पशुवैद्यकाला बोलावून गायीवर उपचार केले. शर्मा यांनी सांगितले की, याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गायीला जखमी करणाऱ्या व्यक्तीला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. आरोपींना अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे. बजरंग दलाचे नेते उपेंद्र सिंग यांनी म्हटले की, याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक न केल्यास आम्हीच त्यांना शोधू. जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळातील पलक्कड जिल्ह्यात स्फोटकांनी भरलेले अननस खाल्ल्याने एका गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला होता. केरळनंतर अशाच प्रकारच्या एका घटनेत हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात एका गर्भवती गायीचा मृत्यू झाला होता. अशा प्रकारची तिसरी घटना आता मध्यप्रदेशात घडली आहे.पोलिसांनी सांगितले की, आरोपी स्थानिक असावा, असा संशय आहे. त्यानुसार तपास केला जात आहे. काही गोपनीय पथके तपासकामी लावण्यात आली आहेत. आरोपी लवकरात लवकर पकडले जातील. दरम्यान, या प्रकरणी केरळातील घटनेप्रमाणे असंतोष पसरू नये, यासाठी राज्य सरकार सतर्क आहे.छत्तीसगढमधील हत्तीच्या मृत्यूप्रकरणी पाच जण अटकेत; तीन वीज कर्मचाऱ्यांचा समावेशरायपूर : छत्तीसगढच्या रायपूर जिल्ह्यात विजेचा धक्का लागून झालेल्या हत्तीच्या मृत्यूप्रकरणी वीज विभागाच्या तीन कर्मचाºयांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.राज्याच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले की, रायगढ जिल्ह्यातील धरमजयगढ वनमंडळातील गेरसा गावात ही घटना घडली होती. या प्रकरणातील दोन आरोपी शेतकरी आहेत. भादोराम आणि अन्य एक शेतकरी यांना अटक करून तुरुंगात पाठविण्यात आले आहे. या शेतकºयांना कृषिपंपासाठी बेकायदेशीररीत्या वीज जोडणी देणे आणि पुरावे नष्ट करणे या आरोपाखाली वीज विभागातील उपअभियंता पी. कुजूर, लाईनमन अमृतलाल आणि एक सहायक, अशा तिघांना अटक करण्यात आली आहे.राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक राकेश चतुर्वेदी यांनी सांगितले की, धरमजयगढ वनमंडळातील गेरसा बीटमध्ये मंगळवारी सकाळी एका हत्तीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. वनअधिकारी घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांना असे आढळून आले की, भादोराम आणि अन्य एका शेतकºयाने कृषिपंपासाठी जवळच्या एका विजेच्या खांबावरून अवैधरीत्या तार टाकून वीज घेतली होती. त्याचा धक्का लागून हत्तीचा मृत्यू झाला.विलासपूरचे मुख्य वनसंरक्षक अनिल सोनी आणि धरमजयगढचे वनमंडळ अधिकारी प्रियंका पांडेय यांनी दोन्ही शेतकºयांची चौकशी केली. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध वन्यजीव अधिनियमांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचवेळी विद्युत विभागाचे उपअभियंता पी. कुजूर आणि अन्य कर्मचारी विजेच्या खांबावरून अवैधरीत्या घेण्यात आलेल्या तारा काढीत असल्याचे आढळून आले. या उपअभियंत्यासह दोन विद्युत कर्मचाºयांवर पुरावे नष्ट केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.आठवडाभरात पाच हत्ती मृत्युमुखीदरम्यान, छत्तीसगढमध्ये मागील आठवडाभरात पाच हत्ती मृत्युमुखी पडले आहेत. यात एका पिलाचा समावेश आहे. सरगुजा विभागात पाच दिवसांत तीन हत्तींचे मृतदेह सापडले होते. त्यानंतर काल रायगढमध्ये एका हत्तीचा मृतदेह आढळून आला आहे, तसेच धमतरीमध्ये हत्तीचे एक पिलू मरण पावले.एका वरिष्ठ वनाधिकाºयाने सांगितले की, सोमवारी धमतरी जिल्ह्यातील मदमसिल्ली भागात हत्तीचा कळप जात असताना त्यातील एक पिलू दलदलीत फसले. हत्तीच्या कळपाने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. वन विभागाच्या कर्मचाºयांनीही त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. तथापि, ते वाचू शकले नाही.मानव हत्ती संघर्ष; पाच वर्षांत ३२५ माणसे ठारछत्तीसगढमध्ये मानव आणि हत्ती यांच्यात सातत्याने संघर्ष होत असतो. त्यात हत्तीप्रमाणेच माणसेही मोठ्या संख्येने मारली जातात.राज्य सरकारच्या अंदाजानुसार, मागील पाच वर्षांत मानव-हत्ती संघर्षात ३२५ माणसे आणि ७0 हत्ती मारले गेले आहेत.यातील बहुतांश लोक मस्तवाल हत्तीच्या हल्ल्यांत मरण पावले आहेत, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश