शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोविशिल्ड लसीला याच वर्षी भारतात मिळू शकते मंजुरी!,चाचण्यांचा तपशील सरकारला सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 06:49 IST

covishield vaccine update : कोविशिल्डच्या आपत्कालीन वापराला ब्रिटनच्या आधी भारत मंजुरी देईल, अशी चिन्हे आहेत. 

नवी दिल्ली : अ‍ॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोविशिल्ड लसीच्या भारतातील आपत्कालीन वापराला केंद्र सरकार पुढच्या आठवड्यात मंजुरी देण्याची शक्यता आहे. असे झाल्यास कोविशिल्ड लसीला मंजुरी देणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार आहे.सीरम इन्स्टिट्यूटने या लसीच्या देशातील मानवी चाचण्यांचा तपशील औषध महानियंत्रकांना सादर केला आहे. कोविशिल्डच्या आपत्कालीन वापराला ब्रिटनच्या आधी भारत मंजुरी देईल, अशी चिन्हे आहेत. देशामध्ये फायझर इंडिया व भारत बायोटेक या दोन कंपन्यांनीही त्यांच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. भारतामध्ये जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही लसींनाही आपत्कालीन वापरासाठी लवकरच परवानगी मिळणार असल्याची चर्चा आहे.

नवा विषाणू फारसा धोकादायक नाही- ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोना विषाणूबाबत गंभीर धोक्याचा इशारा देण्याची सध्या तरी आवश्यकता नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. - साथीच्या फैलावात असे नवे विषाणू तयार होणे हा नेहमीचा प्रकार आहे. आधीच्या कोरोना विषाणूपेक्षा नवा विषाणू अधिक धोकादायक असल्याचे आढळून आलेले नाही, असेही जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले.

अंटार्क्टिकावरही झाली कोरोनाची बाधाआतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या अंटार्क्टिका खंडावरही आता ही साथ पोहोचली आहे. चिली देशाचे अंटार्क्टिकावर संशोधन केंद्र असून, तेथील २६ लष्करी सैनिक व १० कंत्राटदार कोरोनाबाधित झाले. 

सलग दुसऱ्या दिवशी सक्रिय रुग्ण ३ लाखांपेक्षा कमीदेशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाखांपेक्षा कमी होती. बुधवारी कोरोनाचे २३,९५० नवे रुग्ण सापडले, तर २६,८९५ जण बरे झाले. कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ९६.६३ लाख आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या २,८९,२४० तर एकूण रुग्णसंख्या १,००,९९,०६६ आहे. बुधवारी या संसर्गामुळे आणखी ३३३ जण मरण पावले असून, बळींची एकूण संख्या १,४६,४४४ झाली. जगभरात कोरोनाचे ७ कोटी ८३ लाख रुग्ण असून, त्यातील ५ कोटी ५१ लाख रुग्ण बरे झाले. भारतामध्ये अमेरिकेपेक्षा कोरोना बळी, सक्रिय रुग्णांची संख्या कमी आहे. अमेरिकेत १ कोटी ८६ लाख कोरोना रुग्ण आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या