शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतीला रुग्णालयानं नाकारला प्रवेश; रस्त्यावरच दिला बाळाला जन्म

By कुणाल गवाणकर | Updated: November 15, 2020 10:55 IST

रुग्णालय प्रशासनाकडून चौकशीचे आदेश; बेजबाबदार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

श्रीनगर: कोरोना बाधित गर्भवतीला रुग्णालयानं प्रवेश नाकारल्याची घटना काश्मीरमध्ये घडली. त्यामुळे महिलेची प्रसुती रस्त्यावर झाली. या घटनेनंतर परिसरात आंदोलनं झाल्यानं रुग्णालयानं त्याची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. याशिवाय बेजबाबदार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसदेखील बजावण्यात आली आहे.वेवान गावातील महिलेनं प्रसुतीसाठी बांदिपोऱ्यातल्या जिल्हा रुग्णालयात नाव नोंदवलं होतं. प्रसुतीकळा सुरू झाल्यानंतर तिला तिचे कुटुंबीय रुग्णालयात घेऊन गेले. त्यावेळी तिच्या काही चाचण्या करण्यात आल्या. त्यात कोरोना चाचणीचादेखील समावेश होता. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर डॉक्टरांनी तिची प्रसुती करण्यास नकार दिला. बांदिपोरापासून २५ किलोमीटरवर असणाऱ्या हाजिनमधील कोविड केंद्रात जाण्याचा सल्ला गर्भवतीच्या कुटुंबियांना देण्यात आला.दरम्यान प्रसुतीकळा वाढल्यानं महिलेनं रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच बाळाला जन्म दिला. यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी वारंवार रुग्णालयात जाऊन डॉक्टरांकडे विनवणी केली. मात्र तरीही एकही डॉक्टर महिलेवर उपचार करण्यासाठी बाहेर आला नाही, असा आरोप कुटुंबातील सदस्यांनी केला. 'आसपास असलेल्या काही लोकांनी तिच्यासाठी ब्लँकेट्स दिली. पण तरीही रुग्णालयातील एकाही कर्मचाऱ्यानं बाहेर येऊन तिला तपासण्याची तसदी घेतली नाही,' अशी व्यथा त्यांनी मांडली. रस्त्यावरून जात असलेल्या काही महिलांनी प्रसुतीसाठी मदत केल्याचं महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितलं.यानंतर महिलेच्या कुटुंबीयांसह स्थानिकांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांविरोधात आंदोलन सुरू केलं. रुग्णालय व्यवस्थापनानं त्याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले. महिलेस असहकार्य केल्याचा आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. सुरक्षेच्या उपाययोजना करून प्रसुतीसाठी मदत का केली नाही, याची विचारणा कर्मचाऱ्यांकडे नोटिशीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.