नवी दिल्ली : आर्यन खानला अटक केल्यामुळे प्रकाशझोतात आलेले समीर वानखेडे यांना मोठा दिलासा देत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. केंद्र सरकारने वानखेडे यांच्या पदोन्नतीला विरोध करणारी पुनर्विचार याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका शुक्रवारी फेटाळून लावली.
सरकारने माहिती लपविलीवानखेडे यांना कधीही निलंबित करण्यात आले नाही किंवा त्यांच्याविरुद्ध कोणतेही आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही. ‘कॅट’ने ऑगस्ट २०२४ मध्ये वानखेडे यांच्याविरुद्ध विभागीय कारवाईला स्थगितीही दिली होती. ही सर्व माहिती सरकारने लपविली, असा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. वानखेडे नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोत असताना शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. यानंतर ते प्रकाशझोतात आले होते.
Web Summary : Delhi High Court fined the central government ₹20,000 in the Sameer Wankhede case. The court rejected the government's plea against Wankhede's promotion, citing suppressed information about his clean record and stayed departmental actions. Wankhede gained prominence after arresting Aryan Khan.
Web Summary : दिल्ली उच्च न्यायालय ने समीर वानखेड़े मामले में केंद्र सरकार पर ₹20,000 का जुर्माना लगाया। अदालत ने वानखेड़े के पदोन्नति के खिलाफ सरकार की याचिका खारिज कर दी, जिसमें उनके साफ रिकॉर्ड और विभागीय कार्रवाई पर रोक के बारे में जानकारी दबाने का हवाला दिया गया। आर्यन खान को गिरफ्तार करने के बाद वानखेड़े प्रमुखता में आए।