शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सर्जिकल स्ट्राईकदरम्यान अनवधानानं LOC ओलांडून पाकिस्तानात पोहोचलेले जवान चंदू चव्हाण दोषी, 3 महिन्यांची शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 11:57 IST

भारतानं 2016मध्ये पाकव्याप्त काश्मीरात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकदरम्यान अनवधानानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयानं दोषी ठरवलं आहे.

नवी दिल्ली : भारतानं 2016मध्ये पाकव्याप्त काश्मीरात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकदरम्यान अनवधानानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांना लष्करी न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. चंदू चव्हाण यांनी तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नियंत्रण रेषा ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण यांना दोषी ठरवण्यात आले आहे. 

2016 मध्ये सप्टेंबर महिन्यात भारतीय लष्कराकडून पाकिस्तानविरोधात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकदरम्यान  37 राष्ट्रीय रायफल्समधील जवान चंदू चव्हाण हे  नजरचुकीनं पाकिस्तानात पोहोचले होते. 29 सप्टेंबर 2016 रोजी त्यांनी नियंत्रण रेषा ओलांडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिका-यांवर नाराज होऊन चंदू चव्हाण पाकिस्तानात गेले होते. मात्र,  यानंतर भारतानं सर्वोतोपरी प्रयत्न करत त्यांना 21 जानेवारीला पुन्हा मायदेशी सुखरुप आणले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयानं चंदू चव्हाण यांनी तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र या शिक्षेवर अंतिम स्वरुपात शिक्कामोर्तब होणं अद्याप बाकी आहे.  दरम्यान, या शिक्षेविरोधात चंदू चव्हाण अपीलदेखील करू शकतात. 

कसे पोहोचले होते चंदू चव्हाण पाकिस्तानात?28 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय लष्कराने मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले. या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळे उद्ध्वस्त केली. यानंतर काही वेळाने चंदू चव्हाण यांनी नकळत नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले, अशी माहिती समोर आली. यावर भारतीय सैनिक पकडल्याची माहितीही पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून देण्यात आली होती.

21 जानेवारीला भारताकडे सोपवलेजवान चंदू चव्हाण 29 सप्टेंबर 2016 रोजी चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. डॉ. भामरे यांनी सातत्याने यासंदर्भात पाठपुरावा चालविला होता. यास यश मिळून 21 जानेवारीला अमृतसर येथील वाघा बॉर्डर येथे चव्हाण यांना भारताच्या स्वाधीन करण्यात आले. स्वत: डॉ. भामरे या वेळी उपस्थित होते.  

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान