शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अधिक व्हीव्हीपॅट यंत्राच्या पडताळणीस कोर्ट अनुकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:47 IST

लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदारसंघात एकाहून अधिक मतदान यंत्रांमध्ये नोंदलेल्या मतांची ‘व्हीव्हीपॅट’शी पडताळणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अनुकूलता दर्शविली.

नवी दिल्ली : लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदारसंघात एकाहून अधिक मतदान यंत्रांमध्ये नोंदलेल्या मतांची ‘व्हीव्हीपॅट’शी पडताळणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अनुकूलता दर्शविली. निवडणूक आयोगास हे मान्य नसेल तर त्याची कारणे देणारे प्रतिज्ञापत्र त्यांनी गुरुवारपर्यंत करावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले.निवडणुकीत देशातील १० लाख मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांसोबत, मतदारांना केलेल्या मतदानाची छापील प्रत दाखविणारी ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रेही बसविण्यात येणार आहेत. मात्र मतमोजणीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एकच ‘व्हीव्हीपॅट’ यंत्र निवडून त्यातील मतांची प्रत्यक्ष मताशी पडताळणी करावी, असा आयोगाचा नियम आहे.त्यास आव्हान देणारी याचिका २१ विरोधी पक्षांनी केली आहे. मतदान यंत्रांची विश्वासार्हतावाढावी आणि मतदान यंत्रांमध्ये आधी वा नंतर हेराफेरी झाल्याच्या संशयास जागा राहू नये यासाठी निम्म्या यंत्रांतील मतांची ‘व्हीव्हीपॅट’ पडताळणी केल्याशिवाय निकाल जाहीर करू नये, अशी त्यांची मागणी आहे. ही याचिका सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठापुढे सुनावणीस आली. गेल्या वेळी न्यायालयाने आयोगास नोटीस काढली होती व याविषयी माहिती देऊ शकणाऱ्या अधिकाऱ्यास पुढील तारखेलाहजर ठेवण्यास सांगितले होते. त्यानुसार उप निवडणूक आयुक्त सुदीप जैन न्यायालयात हजर होते.जैन यांना उद्देशून सरन्यायाधीश न्या. गोगोई म्हणाले की, एकाहून अधिक मतदानयंत्रांमधील मतांची ‘व्हीव्हीपॅट’ पडताळणी व्हावी, असे आम्हालाही वाटते. अधिक म्हणजे किती हे नंतर ठरविता येईल. पण पडताळणीचे हे प्रमाण वाढविण्यास तुम्ही तयार आहात का?यावर जैन यांनी ‘एकाहून अधिक यंत्रांच्या व्हीव्हीपॅट पडताळणीची गरजच नाही’, असे उत्तर दिले. त्यावर जैन यांना धारेवर धरत सरन्यायाधीश म्हणाले की, मतदानयंत्रांच्या अचुकतेविषयी आयोगाला ठाम खात्री होती तर व्हीव्हीपॅटचा वापर स्वत: का सुरू केला नाही. त्यासाठी न्यायालयास का आदेश द्यावा लागला? त्यावेळी आयोगाने व्हीव्हीपॅटलाच विरोध केला होता, याचीही त्यांनी आठवण करून दिली.एकाहून अधिक मतदानयंत्रांची व्हीव्हीपॅट पडताळणी व्हावी, असे आम्हाला वाटते ते तुमच्यावर अविश्वास म्हणून नव्हे, तर मतदान व निवडणुकीच्या निष्पक्षतेविषयी मतदारांत किंतू राहू नये यासाठी, असे सरन्यायाधीश म्हणाले.पुढील सुनावणी १ एप्रिल रोजी आहे. अधिक यंत्रांची व्हीव्हीपॅट पडताळणी मान्य आहे का व असल्यास त्याचे प्रमाण किती असावे याचे वा मान्य नसल्यास त्याची कारणे देणारे प्रतिज्ञापत्र आयोगाने गुरुवार, २८ मार्च रोजी सादर करावे, असे खंडपीठाने सांगितले.न्यायालये असोत किंवा निवडणूक आयोग असो, कोणत्याही संस्थेने आम्ही करतो तेच सर्वस्वी बरोबर असे मानून कोशात राहू नये. इतरांच्या सूचनांचा विचार करून सतत सुधारण्याची तयारी त्यांनी ठेवायला हवी.- न्या. रंजन गोगोई, सरन्यायाधीश

टॅग्स :VVPATव्हीव्हीपीएटीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक